कुंतल

 आमच्याकडे  एक  पोस्टमन आणि त्यची बायको येत असे आमच्या घराशेजारी मोठ शेत होतं त्या शेतात जे गवत येत होतं त्या गवताच्या कणसात जे बी असतं ते बी खायला खुप सारे पक्षी येतं.

 ते गवताच पोतभर बी तो पोस्टमन काढून घेवून जात असे. व विकत असे. 

आम्ही आवडीने जेव्हा पक्षी पाळत असू तेव्हा तेच बी छोट्याशा पाकिटात विकत आणत असू . निसर्ग भरभरून देतो, ज्याच्या  नशीबात असतं तेवढे त्याला मिळतं, 

मी वरील सर्व  प्रसंग लिहीले ते माझ्या आठवणीतील म्हणजे साधारण  वयाच्या 4 वर्षा पासून  20 वर्षापर्यंत  नंतर आम्ही आमचं जन्मगाव जन्मघर  सोडून गेलो. आणि त्या घराला अनोळखी झालो. 

साधारण वर्षभरापूर्वी  आम्ही पुण्याच्या पुढे भाड्यने शिफ्ट झालो.  तिथे आम्हाला नंदीबैलवाला, फकीर, टोस्टची बेकरी कलईवाला, पिंजांर्या , वासुदेव, अंडीवाला ,सटाकेवाला असे सर्व  भेटले, तिथे  भांड्यावर कपडे गोळा करणारी न येता,केसांच्य बदल्यात भांडी म्हणुन  ओरडत बाई/माणूस येई. . माझं लहानपण मी तिथे पहात होते,  मोठी झाल्यावर ते घाटावरून येतात हे माहीत होतं पण लहानपणीच्या गोष्टी कुठे लक्षात ठेवतो. पण मला ते पहायला  किंवा अनुभवायला मिळत होते. ना त्यांचे पोषाख बदलले होते  ना भाषा, 

खिडकीशीही माझं खूप घट्ट  नातं मला कधी खिडकी बंद करून झोपायला आवडत नसे. किंवा मला कधी भीतीही वाटली नाही. तशीच मी  त्या भाड्याच्या घरात होते तिथे खिडकी उघडी ठेवून झोपले होते. खोलीचा दरवाजा उघडा होता. मला सकाळी चार वाजता जाग आली बाहेरचा चंद्रप्रकाश  आत येत होता,  पक्षी बाहेर आवाज करत होते. बाहेरून वार्याची   झुळूक येत होती बाहेर संधीप्रकाश होता  आणि माझी नजर दारावर गेली . दारावर  चार ते पाच  फूट केस लोबंकाळत होते, मी डोळे ताणून पहात होते दारावर कुणी बसेल आहे का पहात होते पण फक्त कुरळे केस भुरभुर होते, लहानपणी आमच्या कडील नेलेले केसही माझ्या भेटीला आले होते. मी मोबाईल  मध्ये पाहीले चार वाजले होते. मी त्या केसांवरून नजर हटवली नाही मी एक टक त्या  केसांकडे पहात होते. बाहेर उजाडू लागले आत प्रकाश येवू लागला  आणि  साधारण साडेपाच सहाला मी परत झोपेच्या  आधीन गेले. सकाळी  सात साडेसातला उन्हाचे  कवडसे आत येवू लागले, आणि मी उठून दारावर काही कपडा दोरी टांगलेला आहे का पाहू लागले. दारावर हात फिरवून कसला स्पर्श होतो का पाहीला.  हे मनाचे खेळ की भास की एक मेंदूतून परावर्तित  झालेला बालपणाच्या  विचारांचा  आभास  ते माहीत नाही पण निसर्गातील एक गुढ जन्म ,मृत्यु  आणि त्यामधील लोभ, प्रेम ,आठवणी, तयार झालेला अनुबंध म्हणजेच जीवन. ... .


समाप्त

वर्षा पाटील©®🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4