जत्रा 28/jan/2022

 शेतात काही  खुरपणी करायची राहून गेलेली पूर्ण  केली. नवर्याने काही कंद जमिनीतून उकरून काढले व टोपलीत भरले. काही वांगी टोमॅटो खुडून  टोपलीत टाकली. काम थोडी आणि साधी वाटली तरी संध्याकाळ उलटून गेली. सूर्य अस्ताला गेला. आणि आकाशात लाली पसरली खुरपणं, आणि टोपली हातात घेवून दोघं घरी परतले. तीने हातपाय धुवून देवाला ,तुळशीत दिवा लावला. तांदुळ  धुवून भात लावला, भाकरीला उकळी घेताना परत थोडासा चहा करून नवर्‍याला दिला, भाकरीच्या उकळणीवर झाकण ठेवून स्वयपांकघरातून बाहेर आली आणि भाजी चिरत बसली, आजून आला नाही ना? रमाकांत  बापानं बायकोला विचारल? इतका वेळ झाला म्हणजे तालुक्याला गेला असला पाहिजे, आल्यावर काही प्रश्न  विचारू नका. दम भरू नका, तिचा आवाज थोडा कापरा झाला. मलाही त्याची काळजी वाटते,  म्हणून  विचारत होतो .  परत ते बत्तीच्या  काचा पुसत राहीले, वेळी अवेळी अंधारात  शेतात फेरी मारायला जायला  गँस बत्ती बरी पडते म्हणून घासून पुसून स्वच्छ  करत बसले होते. वडिलांनी घड्याळ्यात वाजले किती बघितले.चार वाजता गेलेला पोरगा दहा वाजले तरी आला नव्हता ते दारात येरझार्या घालत होते. बापच तो ऐन तारुण्यात  आलेल्या पोराची काळजी वाटणारं तसं वडिलांना लवकर झोपायची सवय,  बायकोने हळूच विचारले तुम्ही  जेवून घेता का? त्यावर अग मी बाप आहे त्याचा वैरी नाही. नसेल नोकरीत मन रमत तर शेतीत तिघांच भागेल आपण किती दिवस रहाणार आहोत नंतर त्यांच  तीघां -चोघांच भागू शकतं, एवढ माझ्या बापानं मला नी त्याच्या बापानं त्याला ठेवलंय की, पण  पोटाला चिमटा काढून घेतलेलं शिक्षण फुकट जातं ना? 

तेवढ्यात बाहेर रिक्षाचा आवाज आला तिने दार उघडून बाहेर पाहीले, बाहेर रिक्षातून रमाकांत मोठाली खोकी बाहेर काढत होता, रिक्षाचे पैसे देवून त्याने तीन जड बाँक्स घरात आणले, अरे एवढा उशीर का झाला? आईने विचारले  अग थांब सांगतो थोडा दम धर त्याने  म्हटले मी हातपाय धुवून येतो तोवर जेवण वाढ मला खुप भुक लागलीयं आईने तत्परतेने जेवण वाढले, तिघं जेवायला बसले. अग मला  हवे तसे सामान(मटेरियल) मिळत नव्हते, तालुक्यात खूप ठिकाणी फिरलो पण मिळेना शेवटी एका दुकानात सापडले, पण दुकानदाराची सर्व माल घेण्याची एकच अट .खिशात बरोबर तेवढेच पैसे, आंनद गगनात मावेनासा झाला. पण खिशात रिक्षाला यायला पैसे नाहीत स्पेशल तालुक्यातून रिक्षा घेवून यायची नी घरात पण तेवढं पैसे नसले म्हंजे ?मग काय रिक्षाच्या भाड्याचे पैसे कमी करून द्या म्हटलं ,दिले आनंदाने त्याने एवढा माल संपतो म्हटल्यावर!  पण तोवर रात्र झाली ना रिक्षावाला जास्तीचे पैसे सांगू  लागला  अरे जास्तीचे 20-30रपये असतात की घरात कशाला रातच्याला थांबायचं, अग पहिलयांदाच काहीतरी करुन पहातोय मग पूर्ण  माझ्या  पैशानं केलेलं बरं! अरे आई बापाचा पैसा मुलाचा असतो की हो पण बियाणासाठी फवारणीसाठी,खतासाठी औषधासाठी ठेवलेला पैसा रिक्षावाल्याला देवू होय. 

 आपल्याच गावाकडे रिक्षेची फेरी होती ती थोडी उशिराने होती म्हणून  थांबलो, 

आईला कौतुक वाटले  हात धुवायला बाहेर गेलेला पाहुन वडिल डाफरले. किती पैसे होते काय माहीती पण तेही चटरफटर घेवून आला ना उडवून? . आईचे  मुलगा आणि बापाच्या वितुष्टात साफ भजं होवून जाई कुणाची कशी बाजू घ्यायची  कळतं नव्हते, मुलावर विश्वास होता,  तर बापकडे अनुभवाची शिदोरी होती. कुणाची बाजू घ्यायची हाच पेच पडे. 

दमला जीव दिवसभर थकून झोपी गेला, कुठेतरी एक स्वप्न  उराशी बाळगून! 

क्रमशः(२)

वर्षा पाटील ©®🌹



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4