विदुषी
दुसर्या दिवशी नेहमीच्या वेळेवर विदुषी कामावर पोहचली, बाँसने आल्या आल्या विदुषीला केबिन मध्ये बोलवले, विदुषी येताच तिचे अभिनंदन केले, बाँस छोट्या काँन्ट़क्ट च्या डीलवर खूष आहे म्हंटल्यावर ती थोडी स्थिरावली, बाँसने विषयाला सुरूवात केली. आपलं काम बेमालूमपणे पूर्ण करूनच तू येशील, परवीनही फोनवर काल खुप खूष होती कारण तिच्या कडील एवढ मोठ डील पहिल्यांदाच सक्सेस झालंय, ती किंचीत हसली, तिचं ध्येय वेगळच व मोठ होतं, बाँसने तिला म्हटलं काल तुला फोन लावून झाल्यावर ,शाहीन परवेझचा फोन येवून गेला.परवीन सोबत त्याची डील फायनल करत होतो, आज किंवा उद्या तिला भेटायला पाठवणार होतो, पण त्याला म्हंटलं माझ्या सिनीयर डीलर कडून काही चूक झाली, तर तू तिला सेकंड चान्स द्यायचा होतास, इतकं मोठं काँन्ट़क्ट हातचं गेल्यावर माझा तिच्यावर रोष ओढावणार, तिचं डिमोशन होणार आणि परवीनच प्रमोशन झालं की दोघींची एम.बी.ए ची.डिग्री सेम असली तरी तिची सिनियारिटी जाणार असल्याने दोन स्टाफमध्ये बेबनाव होईल. आणि शाल्मली जाँब सोडून गेली तर ....माझ्या आँफीसचं नुकसान होईल ते तूझ्या एक डील पर्यत ठिक! पण बाकीच्या डिलच काय? मग? शाल्मलीने विचारलं, त्यावर बाँसने सांगितलं मी डील पेंडीग ठेवलं मला इतर कंपनी कडून अधिक चांगली आँफर आली असती तर तिच डिल नाकारलं असतंं,पण त्याने अप्रुव्ह केलं, शाल्मली जागच्या जागी उडाली. सर तुमच्या रिक्वेस्ट नी त्याने डील सँक्शन केलं, ? नाही, डिस्कशन साठी किंवा होकारासाठी त्याने फोन केला. वाव सर! म्हणजे ना सेकंड डील, आणखी एक खुशखबर! येत्या रविवारी म्हणजे परवाच दोन्ही डील सक्सेस झाले म्हणून त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व स्टाफ, आणि ज्या कंपनीत डील झाले त्याच्यात पार्टी आहे. पार्टीचे आयोजन बाकी स्टाफ बघेल तू इनव्हीटेशनची लिस्ट तयार करून पाठव,मग मी फायनल करतो, बाँस अतिशय खुष होता.
शाल्मलीला शाहीनची तंतोतंत माहीती देणारा त्याच्या ब्रेकफास्टची वेळ आणि त्याच्या टेबलसमोरचं टेबल बुक करून देणार्या वेटरने शाल्मलीला मदत करून हे डील तिच्या हातून जावू दिलं नव्हतं, ह्या डिल मध्ये त्याचा मोलाचा वाटा होता.
संध्याकाळी डोअरबेल वाजली शाल्मलीने दार उघडले, दारात डिलीवरी बाँय होता, हातात बुके, ग्रिटींग आणि एक गिफ्ट होतं
दार बंद करून शाल्मलीने ते कोणी पाठवले असेल म्हणून आतुरतेने फोडले, अर्थात ते शाहीननेच पाठवले होते अभिनंदनपर ग्रिटींग आणि पार्टीवेअर ड्रेस त्यात होता. सेकड डील तर झाले होते, फक्त ते बाँसला कळले नव्हते. 🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा