विदुषी

 घरी पोहचताच वाँश घेवून येई पर्यंत बाबा , आलं आणि चहा मसाला टाकून  गरम गरम चहा घेवून आले. कशाला? बाबा तुम्ही पण मी आले होते ना लवकर,  केला असता ना मी म्हणत तिने चहाचा कप उचलला चहा खरचं छान झाला होता. टि वी सुरू करण्यापेक्षा  ती बाबांना म्हणाली एकटे दिवसभर घरात असता तर आईची आठवण येत असेल ना? खंर तर आजच्या आँफीस मधील घटनांनी शाल्मलीचा मुड ठीक नव्हता, त्यामुळे तीने रिलॅक्स होण्यासाठी बाबांशी गप्पा मारायचं ठरवलं ,बाबांना विचारलं ,बाबा तुमचं आईशी कधी भांडण झाल होतं का? बाबा म्हणाले  मी माझ्या  आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, माझे आई वडिल सात्विक प्रेमळ बांबाची नोकरी व्यवस्थित कोकणात घर ,जागा,  मी अभ्यासात हुशार डाँ.,वकील व्हाव

 असं आईला वाटे  पण मी  बँकींग क्षेत्रात  करियर करायचं ठरवलं डायरेक्ट  आँफीसर  म्हणून  कामाला लागलो तसं तुझी आई दूरची माझ्या बाबांची नातेवाईक, त्यामुळे ती आमच्या घरी येत असे, पण आम्ही एकाच काँलेज मध्ये असल्यामूळे  भेटायचो, ती माझ्याकडून  नोट्स घ्यायची,  काही अडचण असेल तर शिकायला  माझ्या घरी यायची, आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं,  तुझी आई दिसायला छान होती. बाबाच्या नात्यातील होती. आईला आवडीची होती, त्यामुळे  लग्नाला नकार असण्याचा प्रश्नच नव्हता, लग्न झालं तेव्हा तिला काहीही येत नव्हतं पण तिची आई अतिशय सामान्य त्यामुळे  तुझ्या आजीनी तिला सांभाळून घेतलं, सर्व शिकवलं, तुझी आई स्वभावाने अतिशय गरीब प्रेमळ, तिला लग्नाच्या आधी  फक्त माझ्या आई कडून जेवढ शिकता येईल तेवढं शिक. केव्हा भांडू नकोस, मी ही तसा  शांतच कामा निमित्त कधी त्रास भांडण झालं असेल तेवढच! माझ्या आईनी तुझ्या आईला खूपच हुशार बनवलं, काठी लवचीक नाजुक लगेच लवते, जून आणि ताठर मोडते ,म्हणून तुझी आई असतानाच तुझ लग्न करायचं होतं पण तुझ्या हट्टाने  तीची ती शेवटची इच्छा ही राहून गेली. आता मात्र वडिलांचा आवाज घोगरा  झाला. तेवढ्यात कामवाली बाई  आली. आणि गप्पांना पूर्ण  विराम मिळाला. बाबा बातम्या लावण्यासाठी उठले, आणि शाल्मली किचन मध्ये तीला काही बदल करायचे होते, त्यासाठी कामवाली बरोबर  गेली.... . 

क्रमशः

वर्षा पाटील ©️®️🌹

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4