जत्रा 27/ 12/ 2021

 तो विमनस्क  अवस्थेत  बसला होता. काय कराव त्याला कळत नव्हतं, अशात त्याला एक भन्नाट कल्पना  सुचली, त्याने घरात जावून पाकिटात पैसे किती आहेत,  ते पाहीले. आईला मी जरा जावून येतो म्हणून आवाज दिला, आणि दार ओढून निघून गेला, तो जाताना  मी जातो इतकंच सांगत होता,  पण कुठे चालला काय चालला ,कधी  येणार सांगत नसे. वडिलांनी थोडे डोळे किलकिले केले आणि कुशीवर वळले, आईने घड्याळ्यात किती वाजले ते पाहीले आणि उठली. चहाचं आधण ठेवलं, दुध उतू जावू नये म्हणून त्यावर पाण्याचा शिपका मारला, आणि दोन पेले घेवून त्यात गरम गरम चहा ओतला, एक पेला नवर्याच्या पुढ्यात ठेवला ना दुसरा मेजवर  ठेवून बाहेर गेली. दारात बांधलेल्या बकरीला कोवळा  शेंगेचा पाला घातला आणि गायीच्या पुढ्यात  चारा घालून पाण्याची  बादली ठेवली चार सहा हाताजवळच्या शेंगा तोडून घरात आली स्वंयपाकघरात ओट्यावर ठेवून मेजावरचा पेला उचलला अजून चहा थंड झाला नव्हता.    वडिल चहा पिवून अंगात शर्ट चढवत म्हणाले, तरी मी शेती विषयक  काहीतरी अभ्यास घे, तेवढीच मला मदत  होईल. सांगत होतो, त्यावर त्याची आई म्हणाली,मुलगा शिकल्या शिकल्या मिळाली होती ना नोकरी, एक नाही दोन दोन नोकऱ्या सोडल्या. नोकरी कशी टिकवायची ह्याचीही साधी अक्कल नाही त्याला!,परत बायकोने मुलाची बाजू घेत म्हणाली अहो इतका शिकला तरी पडेल ते शेतात काम  करतो ना तुम्हाला मदत ,!का ?नाही करणार !माझ्या जमिनीचा माझ्या जीवाचा वाडवडिलांच्या कमाईचा  तुकडा विकून मी शिक्षण दिलंय त्याला ,मिलची नोकरी गेली आणि सतत वर्गात  पहिला येणारा पोराची शहराची शाळा सुटली पण मी त्याचे स्वप्न पूर्ण करीन म्हणुन गावचा रस्ता धरला. शेती पिकवून घरखर्च  चालवला., जाण आहे पोराला त्याची,! मी नाही का साथ दिली तुम्हाला?बयको म्हणाली. हो शहरातली असलीस तरी तू शेतीभाटी करायला मदत केलीस, आहे मला  सुद्धा आठवण त्या दिवसांची , बोलता बोलता दोघांनी पायात चपला सरकावल्या,आणि टोपली हाताात घेेेेवून शेतीचा रस्ता धरला.

क्रमशः(१)

वर्षा पाटील. ©®🌹

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4