विदुषी
सकाळी दारात विदुषीला न्यायला कंपनीची गाडी आली. एक तासाचा प्रवास करुन श्याल्मली आँफीस मध्ये पोहचली, आपल्या केबिन मध्ये जावून पर्स लाँकर मध्ये टाकली. शाल्मलीच टेबल साफ करताना पीवूनने काही वस्तूंची सारवासारव केली होती. तीने टेबल नीट केलं. स्वतःला हवं तसं टेबल आवरलं,वाँशरूममधून वाँश घेवून आली. नेहमी प्रमाणे कँटीन मधून आलेला चहा प्याली,आणि कालच्या कामाची डिटेल फाईल कम्प्युटर मध्ये तयार करून ती तीने आपल्या बाँसला सेंड केली. फाईल तयार करे पर्यंत अकरा वाजून गेले , बाँसने इंटरकाँम वरून तिला त्याच्या केबीनमध्ये बोलावून घेतलं, तिची काही चूक असेल तरच बाँसच्या केबिनमधून तिला बोलावणं येत असे, नाहीतर तिच्या कामात बाँस कधीच ढवळाढवळ करीत नसे,काहीतरी चुकलं हे तिच्या लक्षात आलं ती स्टाफ मध्ये सिनीयर आणि हुशार म्हणूनच माहीती होती. तिच्या बाँसला तिच्यावर प्रचंड विश्वास होता. आणि कामाच्या बाबतीत ती प्रचंड आत्मविवासू व परफेक्ट होती. तीने आपलं काम आटोपून घेतलं, व बॉसच्या केबिन मध्ये गेली. .......
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा