विदुषी

 सकाळी  विदुषीला उठून कामावर जायचं नव्हतं, ती डायरेक्ट  मिटींगला  जाणार होती. पण कंटाळा न करता ती उठली. सकाळची  काम आटपून न्याहारी, घेतली,व तयार व्हायला सुरुवात केली. तीने गोल्डन कलरची सँटिनची काळी नाजूक फुलांची बाँडर असलेली  साडी नेसली त्यावर काळ्या रंगाचा सिवलेस ब्लाऊज घातला,  केसांचा सैलसर अंबाडा घातला, मोठे गोल्डन टाँप्स घातले, चेहर्‍याला मरून डार्क  मॅट फिनीशची  लिपस्टिक  लावली. डोळ्याला  आयलाईनर लावलं, आणि सैल आंबाड्यावर  दारातील डार्क  रेड रोज एका कानाच्या बाजूला  घातलं ,त्याच कलरची  नेलपेंन्ट लावलं आणि आरशासमोर  उभी राहीली ती ओन्ली विमलच्या  जाहिरातीतील माँडेल पेक्षा सुंदर दिसत होती. तिने पर्स  उचलली. बाबांना निघते सांगून पायात चपला सरकलेल्या आणि तेवढ्यात दारात कंपनीची गाडी उभी राहीली. गाडीत बसून तीने त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश केला,

तिने दिलेल्या टेबलवर एक 23-24 वर्षाचा मुलगा सुट घालुन बसला होता, शाल्मली येताच तो उभा राहीला. त्याने हस्तोंलदन केले, इतकी सुंदर  लेडी आपल्या कंपनीचे डील करायला आली, हे पाहुन तो थोडा बुजून गेला त्याला काय करायचे ते न सुचून त्याने फाईल  बाहेर काढली, शाल्मलीने मेनू कार्ड  घेवून दोन कप चहा मागवला, त्या मुलाने स्वताचे काँन्ट़क्ट, काम, त्यांचे डील, कंपनीचा करारनामा त्यांना कश्या प्रकारचे काम हवंय किती दिवसात हवं ह्या बाबतीत चर्चा केली. दोघांची चर्चा सुरु असताना, टेबलावर  चहा आणला, परत थोड्या वेळाने वेटर एक कार्ड देवून गेला, आणि अगदी बरोबर समोरच्या टेबलवर तिने  एक  कटाक्ष टाकला. समोरच्या टेबलवर शाहीन परवेझ  त्याची सकाळची न्याहरी करायला खाली आला होता, त्याच हाँटेल मध्ये त्याचं वास्तव्य  होते.तो सकाळी ह्याच वेळेस  सकाळची  न्याहरी करायला येत असे.त्याने त्याची आँर्डर  थांबवली  व हातातील  लायटरने एका मागून एक सिगरेट शिलगवू लागला, त्याने शाल्मलीला कार्ड पाठवून त्याच टेबलावर

  ब्रेकफास्ट  करण्यासाठी बोलवलं, तो  अस्वस्थ  होता त्या पेक्षा गिल्टी  फिल करत होता. 

क्रमशः 


वर्षा पाटील . ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4