विदुषी

 तिने टॅक्सी घराच्या बाहेर थांबवली, पैसे पेड केले, लँचने घर उघडले,  तडक वाँशरूम मध्ये जावून वाँश घेतला, दुपारचे 4वजले होते, पोटात भुकेचा डोंब उसळला होता पण ह्या वेळी जेवण नकोसे वाटले, तरीही तिने जेवणाची भांडी उघडून पाहीली सर्व जेवण नावडते होते, तीने 3-4डबे उघडून एका बोअल मध्ये स्नँक्स घेवून टिव्ही समोर जावून बसली, तिची नजर व कान टीव्हीच्या बातम्या कडे होती, पण हात मात्र यत्रंवतं काम करत होते, शेवटी कंटाळून  टिव्ही बंद करून ती झोपायला गेली, त्या अगोदर तिने वडिलांच्या खोलीत डोकावून पाहिले, वडील शांत झोपले होते, ती आल्याची त्यांना चाहुलही लागली नाही, तिला उगाचच आपराध्या सारखे वाटले,ती आपल्या खोलीत गेली, व पलंगावर पहुडली, तिच्या डोळ्यात पाणी आले, ती अपसेट  झाली, तीचे वयं 30 पर्यंत  पोचले होते, तिच्या वयाच्या मुली लग्न करून संसारात रमल्या होत्या, अचानक ती आपल्या बालपणात पोहचली, ती एक सर्वसामान्य  घरातील मुलगी होती. ती  तिच्या बाबांसारखी दिसायला आणि तिचे बाबा आजोबा सारखे, ती आता राहते त्याच घरात लहानाची मोठी झाली होती. अंगणात कडेला मोठ झाड, त्या झाडाला बांधलेला पाळणा आणि शाळेतून घरी आल्यावर  ती त्या पाळण्यावर बसून परवचा  म्हणायची,  आई तिला झोके द्यायची, आजी आजोबा अंगणातील घराच्या पायरीवर बसायचे, आणि बाबा कामावरून घरी आले, का ते स्वताची गाडी पार्क करायचे,  कधी कधी तिथेच अंगणात गप्पांचा फड सुरू व्हायचा, आणि तो तासभर तरी रंगत असे,  मग आई सर्वांना कपातून चहा आणत असे. कधी कधी बाबा आले की सर्व हाँल मध्ये जमत बाबा फ्रेश होवून आले की सर्व चहा न्याहारी करत मग श्याल्मली अभ्यासाला बसत असे. व वडील उरलेला सकाळचा पेपर वाचत बसतं.अभ्यास पूर्ण  झाला की संध्याकाळची शुभंकरोती आई दारात,  अंगणातील तुळशीत दिवा  लावत असे, त्या नंतर बातम्या लावत व आई ,आजी जेवणाची तयारी करायला जात व श्याल्मली,  जेवण होई पर्यंत  टिव्ही  वर कार्यक्रम पहात  बसे.जेवण झाल्यावर शाल्मली सकाळची शाळा म्हणून झोपी जात असे.

आजी आजोबा आई बाबा अशी शाल्मलीची फॅमीली होती.घरात सर्व धार्मिक ,शांत ,प्रेमळ,तीची शाळा संपंता संपता  आजोबा गेले, काॅलेज  संपता संपता आजी गेली. चारच वर्षांपूर्वी आई वारली . आता वडील आणि शाल्मली दोघांचं घरात रहात होते.

कामवाली बाई सकाळचे व संध्याकाळचे जेवण करायला येत असे. तीच लादी भांडी करत असे. सकाळी शाल्मली चहा नाष्टा करून आठ वाजता घर सोडत असे , रात्री दहा पर्यंत केव्हाही घरी येत असे.बाबा एकटेच घरात दिवसभर बागकाम, वाचन करत बसतं... 

संध्याकाळी सहा वाजता  शाल्मली झोपेतून जागी झाली.बाहेर वडील अंगणातील झाडांना पाणी घालत होते.वाॅश घेवून शाल्मलीने चहाचं आधण ठेवलं, वडिलांना व स्वताला  ट्रे मध्ये चहा घेवुन आली.बाबा खूर्चीत बसत  म्हणाले अगं काहीतरी निर्णय घे. मी पिकलं पान कधी गळून पडीन नेम नाही.बाबा साठीत कोण मरत बिरत नाही तूम्ही असं काॽ म्हणता, अगं मी एकटा रहीलो तर काही हरकत नाही.पण तू एकटी राहता कामा नये. तेवढ्यात कामवाली बाई आली. तिने आत जावून स्वःताला चहाचा कप आणला व तीही गप्पांत सामील झाली.....

क्रमशः

वर्षा पाटील.©®🌹

8879921801


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4