कुंतल

 ही सर्व लोक आगदी आजुबाजुच्या  गावातून येत नव्हती ती दुसर्या शहरांतून ,दुसर्या तालुका, जिल्हा, अगदी दुसर्या राज्यातून  येत होती.  ह्यात नारळ पाडायला आलेल्या  माणसात मला हा खेळ सावल्यांचा  पिक्चर मधल(मी हा पिक्चर  लहान असतानाच पाहीला)नरसूचं भूत दिसायचं.

चिंच पाडायला आलेल्या  माणसाला चिंचेवरच्या भुताची कशी भिती नाही वाटतं ?असा भोळा प्रश्न मला पडायचा, गावातील सलोख्याची जागा लबाडीने घेतली. 

आमच्या घरात सर्वांचे केस लांबलचक आत्या, काकी, आजी, माझ्या आईचे थोडे कमी तरी भरपूर जाड,आमच्या घरी रविवारी केस धुण्याचे कार्यक्रम असत.  आदल्या दिवशी रात्र, शिकेकाई रिठे आणि सुवासिक काचरी भिजत घालून  दुसर्या दिवशी सकाळी  नारळाचं दुध काढून ,केसाला शिकेकाईचं पाणी लावून काचरी घातलेलं दुध लावून रिठ्याने केस धुतले जात.,लांबसडक  केस वाळवले ,की त्याची गुंता काढली जाई. 

जुनी कोकणातली घरे प्रत्येक कोपरा, कोनाडा   अगदी छोटसं भोक(होल)देखील हेतू परेस्पर असे. तसेच आमच्या घराच्या मुख्य  ओटीच्या  लाकडी चौकटीच्या मुख्य  खांबाला एक होल होतं ते  जरा उंचीवर होतं, त्यात लवचीक काडी घातली की बुतारीचि पुर्ण  काडी आत जात असे. म्हणजे तो खांब पूर्ण  पोकळ होता. ती जागा मुद्दाम केस ठेवण्यासाठी होती. व तो वासा साग ह्ला  लाकडाचा असून  80 वर्ष  झाली तरी त्या होलापासून  कुठेही त्या खांबयाला साधी चीरही गेलेली नाही. त्यात वर्षभराचा गुंता  साठवून ठेवला जात असे.ओटी ही स्वयपांंक घरापासून दूर व  केस  जेवणात येवू नयेत. कोंबड्यांच्या पायात अडकू  नयेत हा हेतू. 

 दरवर्षी  एक बाई कपाळाला भलं मोठ कुंकू, नऊवरी सुती हिरवी किंवा लाल काठापदराची साडी   नेसून ती बाई फक्त तो आजीकडे गुंता मागायला  यायची आम्ही बोटाने, काडीने तो काढून द्यायचो, लांबलचक  केसांचे एवढे पिशवीभर गुडांळे ती काय करत असेल असा प्रश्न मला लहान वयातही पडत असे.पण कुणाचं लग्न असलं की आई कासाराच्या दुकानातून केसांना  लावायला गंगावन आणत असे ,व आमच्या कडील केस हे गंगावन  बनवायला नेत असतं, आमचेच फुकट दिलेले केस परत आम्ही विकत आणत असू 

क्रमंशः

वर्षा पाटील ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4