जत्रा 9/jan/2022
आई आणि प्रशाली खेळणीवाल्या जवळ गेल्या, त्याच्या कडे तीन- चार खेळणी होती . त्यातील एक मात्र विमान होते. प्रशली खूष होवून आईला म्हणाली ते बघ विमान! त्याला आश्चर्य वाटलं सकाळचीचं मुलगी जिच्या साठी आपण एक विमान बाजूला काढून ठेवले होतं, त्याने विमान मुलीच्या हातात दिलं प्रशालीच्या आईने त्याला 100 रुपयाची नोट दिली. तसा तो थोडा घुटमळला नोट हातात घेत म्हणाला अजूनही येत असलीस तर चल! आज मी एकाही खेळण्यावर एकही रुपया कमी केला नाही. आज मी 1500 खेळणी विकली. ही माझी एका दिवसाची कमाई ,एका महिन्याची मेहनत आहे. आई बाबांनी घरात घेतलं नाही तरी मी विश्वासाने तूला सांभाळीन, आज रस्त्यावर मी एवढी कमाई केली आहे. तूला काही कमी पडू देणार नाही. तिने मान वर करून पाहीलं 10-15 मिनिटांत बराच रस्ता मोकळा झाला होता. तिने मुलीला उचलून घेतलं आणि झपझप रस्ता चालू लागली. डोळ्यासमोर अंधारी येते की काय वाटू लागलं, डोळ्यातील पाण्याने समोरील रस्ता दिसेनासा झाला. घरी आल्यावर मुलगी ते विमान उघडून लावू लागली आणि आजोबा तिला मदत करू लागले. .. .
तिच्या मनात विचार आला आज बाबा नसते आले तर परत मी विमान आणायला गेले असते. आणि गेले असते, तर त्याच्या बरोबर कायमची गेले असते. ...
दोन्ही एकाच गावचे एकाच मिलमध्ये आणि एकाच चाळीत राहणारे त्या दोघांची एकुलती एक मुले एकाचं शाळेत शिकणारी मिल बंद पडली आणि दोघांनी गावचा रस्ता धरला, पून्हा गावच्या शाळेतही ती एकत्रच आली. रमाकांत हुशार होता आणि उर्मिला चुणचुणीत. उर्मिलाचे घर गावात तर रमाकांतचे घर शेतावर दोघं सतत शेतावर हुंदडत असत, कुणाला त्याचे काही वाटत नसे पण १२ वी नंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले, रमाकांत तालुक्याला शिकायला गेला,आणि वडिलांनी जमिनीचे चार भाग केले आणि त्यातील एक भाग मुलाच्या शिक्षणाला विकला, आई मुलाला फार लागलं, पण इलाज नव्हता, लोकांनी बापाला वेड्यात काढलं, जमिन पिकवण्यासाठी शिकायचं की जमिन विकून शिकायचं? ती घरी यायची काकूला तांदुळ निवडून दे, भाजी निवडून दे, मदत करायची, रमाकांतबरोबर मालव्यात जावून भाजी खुडायची,तो तिला त्याचे स्केचेस दाखवायचा, छान रेघोट्या ड्डाँईंग दाखवायचा ते पाहून तिला हेवा वाटायचा तिही हुशार होती, पण मुलगी होती, तिला इंजिनियर करायची मानसिकता तिच्या आई, बापात नव्हती. एकुलत्या एक मुलीचं शिक्षण झालं की लग्न करून टाकायचं हीच त्यांची इच्छा होती., रमाकांत तिला आपली स्वप्न सांगी आणि ती आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवी, तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले, रमाकांतचे शिक्षणाचे शेवटचेे वर्ष होते . आणि उर्मिलाचे लग्न अचानक जमलेे. सरपंचाने मुलगा आणला तेेेेव्हा तिचे वडील नाही बोलुु शकले नाहीत . बघायच्या कार्यक्रमातच साखरपूडा आटोपला.
रमाकांतने आईला खूप विनंती केली.तेव्हा आईवडिल नाही बोलु शकले नाहीत. त्याच्या आग्रहखतर ते उर्मिला च्या घरी गेले. पण उर्मिलाची आई म्हणाली तुमचा मुलगा अजून शिकतोय, तो नोकरी कधी करणार आणि लग्न कधी करणार आणि नोकरीवाला,मुलगा त्यात लग्नची तारीख ठरली ती तोडू नी तुमच्या शेतात राबायला मुलीला पाठवू . तुमच्या मुलाला आवडली म्हणून..
रमाकांतला त्याच्या आईच अपमान आवडला नाही, पण त्यांच बोलणंही खरं होतं. .ते लग्न मोडू शकले नाहीत.
क्रमशः (७)
वर्षा पाटील ©®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा