जत्रा 9/ jan /2022

 दुपारी तीन नंतर पुन्हा जत्रेत गर्दीला सुरूवात झाली, त्यांना आपल दुसरं खेळण्याचं खोक फोडलं, सकाळी  घरी घेवून जाणार्या मुलांची खेळणी पाहुन खुप सारी मुले ते खेळणे घ्यायला येत होती. आनंदाने हवे ते खेळणे विकत घेत होती. रात्री सात नंतर त्याने  तिसरं बाँक्सच्या फोडला हा शेवटचा बाँक्सच्या  संपो ना संपो त्याचा धंदा मस्त झाला होता. तिसर्या बाँक्सची खेळणी बाहेर काढताना त्याला सकाळची बोनी  करायला आलेली लहान मुलगी आठवली, तिला विमान हवे होते. तिची आई परत येते,  म्हणून गेली आणि आलीच नाही. ती हे  'खेळणं' बाजारातील  इतर खेळणी आणि खाऊ ह्यामध्ये विसरून सुद्धा गेली असेल पण त्याला उगीचच चुटपूट लागली आता तर ती मुलगी ते खेळणं नयायला येण्याची शक्यताही संपून गेली. त्याने तिसर्या बाँक्समधील 20-25 विमानातील एक विमान बाजूला काढून  ठेवले.. . .. 

 आज त्रिपुरी पौर्णिमाचा उपवास सकाळ सकाळ देवदर्शनाला  गेले तर भली मोठी लाईन नंतर सर्व बाजार फिरले गृहोपयोगी वस्तु पण जत्रेत छान मिळतात छोटीला हवा तो खाऊ खेळणी घेवून आले पण  तिला आवडलेलं कोणतंतरी  खेळणं विसरले, परत घरी आल्यावर ते खेळणं आणायला जायचं म्हणजे.. ...

प्रशाली दिवसभर मन खट्टू करून  बसली , जेवायला पण तयार  नाही, सांयकाळी आजोबा आले येताना खाऊ खेळणी  घेवून आले, पण प्रशाली काही केल्या  हट्ट सोडायला तयार नव्हती ,तीला तेच विमान हवे होते शेवटी आजोबांनी तिला 100 रूपये दिले आणि सांगितले आईला घेवून परत जत्रेत जा पण खेळणीवाला  खेळणी संपवून गेला असेल तर रडात्रचं नाही आपण पुढल्या वर्षी सेम विमान आणूयात. ,नात आनंदून  गेली.आजी, आजोबानी दिलेले वर्षभराचे पैसे ती पिगीबँकमध्ये जमवून ठेवी आणि जत्रेच्या दिवशी मग डबा फोडी.आज सकाळी  पण ती असाच डबा फोडून जत्रेत गेली होती आणि पैसे असून   आईने आवडलेल विमान घेवून दिलं नव्हतं, ती परत वेगळ्याच रस्त्याने आली, जत्रेत तो खेळणीवाला लागलाच नाही, आई तिला घेवून परत घरी आली आणि म्हणून ती आईवर रागावली होती. एवढ्या रात्री परत जत्रेत न्यायला आई तयार नव्हती. पण आजोबांनी  तिला समजावलं, आणि दोघी परत जत्रेत गेल्या, फिरत फिरत आणखी काय कामाचं दिसतं का  पहात पहात देवळापाशी पोहचल्या एव्हाना रात्रीचे 11 वाजले होते. जत्रा संपायला अजून एक तास होता. अजूनही जत्रेत बरीच गर्दी होती. अजूनही देवदर्शनाला  रांग होती ज्यांना दिवसभरात दर्शन मिळालं नाही  ते रात्री रांगेत उभे होते. ज्यांचा दिवसभरात माल संपला ते आपल्या जागेवरून निघून जात होते,  तेव्हा  काही जागा मोकळ्या झाल्या होत्या.  आकाश पाळणे  मस्त फिरत होते, आणि जत्रेची शान वाढवत होते. खाऊचे स्टाँल हळूहळू  रिकामे होत होते. 

प्रशालीने  खेळणीवाला पाहीला आणि आनंदून गेली......

ती आईला म्हणाली तो बघ खेळणीवाला. ... .

क्रमशः (६)

वर्षा पाटील©®🌹 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4