जत्रा 9/ jan/2022

 एक वर्षात रमाकांतचे शिक्षण पूर्ण  झाले. उर्मिला ला मुलगी झाली. तिचा सासरी छळ होतोय. इतकच त्याला माहीत होतं, पण उर्मिलाशी आता त्याच  काही  नातं नव्हतं, तो नोकरी  शोधू लागला, त्याने चार वर्षात दोन नोकऱ्या  केल्या,  त्याची नोकरी सुटली. आणि उर्मिलाचे लग्न तुटले, पण ती गावात परत आली नाही, साधीशी नोकरी करून तेथेच  कुठेतरी राहु लागली. तिचे आई वडील  तिला मदत  करीत ,एकदा धाडस करुन रमाकांत ने तीचे घर शोधले, रस्त्यात गाठले, आपण एकत्र येण्याची म्हणुन विनंती केली. पण उर्मिला  तयार झाली नाही. आता  परत त्याच्याकडे  नोकरी  नव्हती.. ... 

उर्मिलाची तंद्री भंगली  प्रशाली आईला तयार केलेले विमान कसे उडते ते दाखवत होती. टाळ्या वाजवत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. 

दोन दिवस राहून बाबा गावी घरी निघून गेले. उर्मिला  व प्रशाली परत दोघीच राहील्या. उद्या तिला प्रशालीला शाळेत सोडून पूढे कामावर जायचे होते. 

तो तासनतास बसून  विचार करे...

त्याला एक भन्नट कल्पना सुचली. ....

क्रमशः(८)

वर्षा पाटील©®🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4