जत्रा 6/jan/2022

 त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या रात्री रमाकांत   जेवून आई बाबांना नमस्कार  करून रिक्षात 3 खोकी घेवून निघाला. निघताना आईने जमवलेले एक हजार रूपये हातावर ठेवले. त्याने नको आहेत खर्चाला माझ्याकडे म्हणाला .बाबांचा  हातही खिशात  गेला बाबांना नको आहेत माझ्या कडे  मला जायला असले म्हणजे पुरे मी पैसे कमवायला चाललोय.असे म्हणत, पायऱ्या उतरला. त्याने रिक्षा स्टँडकडे वळवली. रात्रीची वेळ आणि 6-7तासांचा प्रवास त्यामुळे  बसमध्ये  फक्त 4-5 माणसं, त्याने खोकी सीट खाली लोटली. तिकीट काढलं नी बाहेरच्या  खोक्यावर अलगद आडवा पाय ठेवला की कुणी खोका  खेचू शकणार नाही आणि सरळ सीटवर आडवा झाला.नी  झोपी गेला. 

सकाळी तीन वाजता तो एस टी च्या आवारात उतरला. तिन्ही खोकी  खाली उतरवली, आजूबाजूला रिक्षा पाहू लागला तेवढ्यात  एक रिक्षा येवून बाजुला उभी राहिली .भाडं ठरवून तो रिक्षात बसला. 20 मिनिटात चढण चढून तो शंकराच्या  देवळाजवळ  पोहचला  बरेचसे पायर्‍या आडवून काहीबाही विकत बसले होते. अजून सकाळची आरती झाली नव्हती. पायरी पासून थोड दुर पण मेन रस्ता आणि देऊळ ह्याचा मध्य पाहून त्याने दगडी भिंतील टेकून आपली चादर अंथरली, दुसर्या चादरीचे फोल्ड करून ती बसण्यासाठी अंथरली .आता रात्री बारापर्यंत  त्याला एकाच जागी बसायचे होते. देवळात शिरताना नळ होता तिथे हातपाय तोंड धुतले, जवळच असलेल्या  चहावाल्या जवळ चहा प्याला.देवळात आरती सुरू झाली आणि रमाकांत ने पहिला खोका उघडला. चादरीवर एक एक प्लँस्टीकमध्ये पँक केलेलं छोटे  छोटे  बाँक्स  लावू लागला. त्यांचे झाकण बाँक्सच्या  पाठी ठेवून वरून प्लास्टिकचे  वेस्टन लावलेले होते जेणेकरून आतील खेळणे स्पष्ट  दिसत होते. एक बाँक्स पूर्ण  लागे पर्यत सहा वाजले,त्याने वरती  पाहिले दिड दोन तास तो सुबक  पणे बाँक्स रचत होता. तेव्हा त्याला आजूबाजूचे भानही नव्हते.  देवापुढे लांबच लांब रांग लागली होती. हार नारळवाल्या कडे गर्दी झाली होती. प्रसादासाठी मिठाईवाल्याकडे रांग लागली  होती. जत्रेला सुरूवात  झाली  होती.... ... . 

रमाकांत नी विचार केला खेळणी  किती संपतील ते आताच ठावूक नव्हतं  पण मालाचे पैसे आणि परत तेवढाच माल आणायला पैसे इतके मिळाले तर आईला पैसे द्यायला मिळतील आणि पुढल्या वेळेला जस्त हुरूप येईल आणि आईचा विश्वास वाढेल... .. 

आठ वाजता एक बाई आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला घेवून आली. तिने खेळण्याची किंमत विचारली त्याने 100 रूपये सांगितले त्यात जाड कडक पुठ्ठ़याचे ठोकळे होते. ते ठोकळ एकमेकांना जोडले की सुंदर रंगीत प्राणी ,पक्षी, पृथ्वी, जगभरातील नकाशे, गाड्या,  मराठी  इंग्रजी अंक,  अक्षरे  हेलिकॉप्टर, आणि विमान तयार करता येत होते,  एवढेच नव्हे तर गाड्या चालवता येत होत्या तर विमान हेलिकॉप्टर  हवेत उडवता येत होते.   त्याने काही खेळणी प्रात्यक्षिकां साठी ठेवली होती. सुरूवातीला विकायला वाटणारी त्याची लाज थोडी कमी झाली होती. ती बाई  खेळणी हाताळून  पहात होती. छान मान हलवणार पक्षी माना  डोकावणारे प्राणि आकर्षून  घेत होते, पण त्या छोट्या मुलीला,त्याच्य  हातातील उडणारे विमानच हवे होते. तीने 80 रूपयाला  नाही का देणार विचारले,  त्याने एकच भाव असे सांगितले थोड्या  वेळाने  देवळात  जावून येते म्हणाली  नी निघून गेली. देवळात रांगेतून देवद र्शनासाठी  प्रत्येकाचा नंबर यायला एक  एक तास लागत होता,  येवढी गर्दी होती, प्रत्येक लहान मुल, प्रत्येक स्त्री पुरूष नाविन्यपूर्ण  खेळणं म्हणून  थांबत होते, काहींना ते स्वस्त  तर काहींना ते महाग वाटतं होते, काही मुलांचा हट्ट म्हणून ,काही आवडले म्हणून खरेदी करत होते.  गर्दीत पिपाणीचे आवाज तसेच आपला माल विकला जावा म्हणून  ओरडणार्या विक्रेत्याचा आवाज ह्याने जत्रा भरली होती, पण कुणालाही  त्याचा त्रास होत नव्हता,, .........

दुपारी थोडी  गर्दी  कमी झाली. त्याने नळावर हात धुतले आईने दिलेली शिदोरी  सोडली, खाता खाता  तो मनात विचार  करत राहीला.  पहिला  बाँक्स संपला ,जवळपास  500 खेळणी संपली होती. ती बनवताना त्याची एक महिन्याची  मेहनत,  अचूकता,  बुद्धी आणि एकाच जागेवर तासनतास बसून रहायची क्षमता सारं पणाला लागलं  होतं. पण आता त्याला समाधान  लाभत  होतं कारण त्याने घेतलेला निर्णय  अचुक होता. पहिल्याच फेरीत त्याचा प्रोजेक्ट सक्सेस  झाला होता. त्याचा आत्मविश्वास  वाढला होता. नोकरीचा विचार त्याच्या मनातून हद्दपार झाला होता. 


क्रमशः(५)

वर्षा  पाटील ©®🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4