जत्रा(10/ Jain/ 2022)

 उरलेली तिन्ही खेळणी संपवून रमाकांत  घरी जायला निघाला उर्मिला नी दिलेली नोट त्याने पाकिटात वेगळ्या कप्प्यात  ठेवली आठवण म्हणून ! त्याने देवाला लांबूनच नमस्कार  केला. घरी प्रसाद  म्हणून काही न्यायची त्याला इच्छा  झाली नाही. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात  त्याला यश लाभले. आईचा, देवाचा  आशिर्वाद  लाभला. आजची कमाई ही त्याने एका दिवसात कमावले असले तरी ते पगारा सारखे एका महिन्याची, कमाई होती.त्याने कमावलेले पैसे हा एका कंपनीच्या सी. ई. ओ.च्या महिन्याच्या पगारा एवढे होते. पण त्याचे मन आनंदी समाधानी झालं नाही. तो ह्या शहरात परत येणार नव्हता. 

घरी  गेल्यावर त्याने गरम पाण्याने अंघोळ केली. देवाजवळ आपल्या धंद्याची पहिली कमाई ठेवली. आईच्या हातचे गरम गरम जेवण जेवला. आणि आई काही विचारायच्या आत झोपी गेला.  तिन्ही खोकी  परत आणली नाही हे पाहून आईने हुश्य! केले, आई बाबा संध्याकाळी शेतवरून  परतल्यावर त्याने आई बाबांच्या हाती एक तिहाई  रक्कम ठेवली. इतके पैसे एका दिवसात कमावलेले पाहुन आई हरकून  गेली,  मुलाची एक महिन्याची मेहनत कामास आली. ती मुलाचे कष्ट पहात होती. त्याने दुसरा हिस्सा नविन कच्चे मटेरियल  आणायला तर तिसरा हिस्सा ये,  जा करण्यासाठी सामान आणायला मोटार सायकल घ्यायला ठेवली. 

आईने त्याला तू खूष नाहीस ना? म्हणून विचारले, ती भेटली होती का? तिने यायला  नकार दिला का विचारले? कशी येईल आपल्याकडे यायला तिला तिच्या आई बाबांशी  वाकडे घ्यावं लागलं, त्यांनी घाईत घेतलेला निर्णय  तिचं एकटीच  आयुष्य उध्वस्त करून गेला का? माझ्या मुलाचं जीवन पण दुःखी करून  गेला. रमाकांतने आईला मिठी मारली. त्याचे दुःख आईला जाणवत होते. उर्मिला  परतून यावी अशी तिचीही ईच्छा  होती. 

पण तीची समजूत काढायला ती तेवढ्या लांब जावू शकत नव्हती आणि गावात आल्यावर भेटूही शकत नव्हती.. .. 

           ह्यावेळी  त्याने तिप्पट पैशाची गुंतवणूक  केली. हाताखाली लहानसहान कामाची मदत करायला गावातील 10 वी झालेला हुशार मुलगा घेतला. अशाच वर्षभरातील गावोगावच्या जत्रेला जावून माल विकून नफा मिळवला . त्याने वडिलांच्या एका शेतात लांबलचक  गोडावून बांधले , शहरात जावून होलसेल  कचे मटेरियल विकत आणले 20-25 कामगार ठेवले, होलसेलर  कडे माल  विकला,  आणि बघता बघता खेळण्याच्या कंपनीचा मालक झाला. खेळण्यात अनेक सुधारणा झाल्या प्लसकटीकचा वापर करून खेळणी मजबूत व पाण्यात भिजून खराब होणार नाहीत. ही काळजी घेतली. तसेच टिकावू व अधिक आकर्षक  बनवली. खेळण्यात ब्रेनचा  वापर अधिक असेल अशी खेळणी बनवण्याकडे कल  दिला. चार वर्षात  लक्ष्मी  त्याच्या घरी पाणी भरू लागली. चारचाकी  गाडी आली.  डबलमजली  बंगला बांधला. तिथून रस्तावरची रहदारी स्पष्ट दिसे.  क्वचित रस्तरावरून  गावात उर्मिला  येताना  दिसे, तेव्हा मात्र रमाकांतच्या मनात कालवाकालव  होई. आताशी ती गावात येईनाशी झाली. पण तिची खडानखडा माहिती रमांकातला असे,  तिचे अतिसामान्य जीवन  त्याच्या हद्यावरची जखम होती. त्याने उच्चभ्रू  मुलीशी लग्न  केले, गावात रमाकांत चे  कौतुक असे पण तो गावात कधी समरसून  मिसळला नाही. 

त्याच्या  आईला त्याचे  कौतुक होते. तर वडिलांना  शेतजमीन  विकून मुलाला शिकवला, ते त्याने कष्टाने सार्थ केले  त्याचा अभिमान होता

त्याने अनेक महागडी वाँलेट विकत घेतली,  पण त्याच्या एका कप्यात त्याने उर्मिलाने विमान  विकत घेतलयवर दिलेली नोट तशीच जपून ठेवली. त्याने बनवलेल्या पहिल्या खेळण्याची  ती किंमत होती ती नोट आणी ती देणारी दोघीही त्याच्यासाठी अनमोल होत्या. 

समाप्त(९)

वर्षा पाटील ©®🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4