1) दरवळ
थोडीफार खरेदी करावी म्हणून केतकी माॅल मध्ये गेली.अचानक तिला मकरंद तिचा काॅलेजचा मित्र भेटला,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, आणि हातातील बाॅक्समधून ४-५पत्रीका वेगळ्या काढत ,व एक केतकीच्या हातात देत म्हणाला बरोबर एक महिन्यांनी माझं लग्न आहे.तू नक्की ये आजच पत्रिका छापून झाल्यात, उद्या गावाला कुलदैवताला आमंत्रण घेवून जायचं मग तूझ्याकडे यायला वेळ मिळेल ना मिळेल, अरे राहू दे नको पत्रीका नाही,तू विसरशील,म्हणूनच मी ४-५पत्रीका देवांच्या नावाने आधीच बाजूला काढल्यात.आमंत्रण देण्याची पध्दत आणि आपुलकी पाहुन केतकीला कौतूक वाटलं , ग्रुपच तसा छान होता.एकत्र केलेला अभ्यास,एकमेकांना न समजलेली समीकरणे एकत्र सोडवलेली, एकत्र कँटीनमध्ये तास बंद करून मारलेल्या गप्पा, एकमेकांचे सेलिब्रेट केलेले बर्थ डे. आणखी खूप काही...
आज जवळ जवळ 10 वर्षानी भेट झाली होती, आणि त्याच्या घरची मंडळी त्याची माँल बाहेर वाट पहात होती.ये गं म्हणाला व निघून गेला. थोडीशी खरेदी करून ती बाहेर आली. व स्कूटीच्या डिकीत सामान ठेवून स्कूटी स्टार्ट केली.
घरी आल्यावर आधी तिने पत्रिका वाचली, पत्रिका खूपच सुबक होती गंमत म्हणजे तो त्याला काँलेजात आवडणाऱ्या मुलीशीच लग्न करत होता, म्हणजे बरीच ओळखीची लोक भेटणार होती, करियर, आणि सेटलमेंट हे लग्ना आधीच करून मग लग्न असं ठरवल्यामुळे त्यांनी लग्न उशीरा करायचा निर्णय घेतला होता.तीने दोन रिमायंडर लावले. एक लग्नाच्या आठ दिवस आधीचा व एक लग्नाच्या एक दिवस आधीचा.
शनिवार संध्याकाळी केतकीने पटापट कामं आटोपली, आणि कपाट उघडलं ठेवणीतले महागड्या सर्व साड्या लावून पाहिल्या पण एकही पसंद पडेना, ते तसंच बाजूला ठेवून तीने सर्व दागिने नजरेखालून घातले नी काय घालायचं ते ठरवलं, तशी दागिन्यांची हौस नव्हती पण तरीही आवडले म्हणून तीने केले होते, सर्व आवरून केतकी झोपी गेली. ... .
रविवार म्हणजे अंमळ आळस उशीरा उठून ही केतकीने भराभर कामे आटोपली़. चार वाजता तयार होवून माँल मध्ये जायला निघाली,आधीच सांगून ठेवल्यामुळे शेजारच्या आशूच्या आईने आशूला तयार करून ठेवले होते. दोघी गाडीवर बसून माँलमध्ये खरेदी करण्यासाठी निघाल्या.
जर आवडली तर एक छान साडी घ्यायची नाहीतर मग एक दोन घरच्याच साड्या तयार केल्यात त्यावर मॅचिंग सर्व सेट घ्यायचे,
केतकी साड्यांच्या शोरूम मध्ये प्रवेशली, तिने बजेट सांगून साड्या काढायला सांगितल्या, तिच्या बजेट मध्ये आतिशय सुंदर सिल्कच्या साड्या होत्या दुकानदारने अतिशय आग्रहाने छान छान साड्या दाखवल्या, त्यात केतकीलाही खूप साडया आवडल्या,तिला खूप भरजरी साडी नको होती, पण त्यातलीच सिल्कची अबोली साडी त्यावर खड्यांचे मोर होते व पदर डार्क राँयल ब्लू नक्षीदार पाचूचे मोर डिझाईन असलेली साडी पसंद केली. आशूला आवडली का विचारले, तीला रंग खूपच आवडला, पण आपल्याला विचारून आपला आवडता रंग घेते म्हणून तिला खूप आनंद झाला. त्यातील ब्लाऊज पीस कट करून तिथेच शिवायला दिला.त्यावर मॅचिंग बंँगलही, चप्पल, हेअरस्टाईल अँसेसरीज घेतल्या,आता छानसा आहेर पहायचा होता, खूपश्या गिफ्ट शाँपमध्ये फिरली. शेवटी एक मोठा हँगिंग लोलकाचे झुंबर पँक करून येत्या संडेला दिलेल्या पत्यावर वर पाठवायला सांगितला. नंतर एक छानसा बुके बुक करून त्याच पत्यावर पाठवायला सांगितला, सर्व आटोपल्यावर आशूला छानसा ड्रेस घेवून, मग तिला थोड माँल मधील खेळण्यानंवर खेळवून थोडी भूक लागली म्हणून रगडा,आईसक्रिम खाऊ घातलं, एव्हाना साडेआठ वाजले होते, दोघींनी माँल सोडला व गाडी स्टार्ट करुन घरी रवाना झाली.....
क्रमशः भाग1
दरवळ
वर्षा पाटील. ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा