लिंबू



लहान मुलांना लिंबू ,टिंबू, कच्चा लिंबू, हे खेळात म्हणतात, म्हणजेच लिंबू हे सहज उपलब्ध होणारे,  लहानांन सकट सर्वाना माहीत असलेलं  फळभाजी आहे. कच्च असताना ते हिरव्या  रंगात असतं व चवीला खूपच आंबट असतं.पिकल्यावर त्याचे   साल पिवळे होते. त्यात मोठया प्रमाणात citric acid असल्यामुळे चवीला तसेच राहते. आणखी त्यात  vitamin C, vitamin A, calcium, phosphorus ,iron, And Vitamin B complex असते. 

लिंबू औषध म्हणून उल्टी, उन्हळी, अपचन, खोकला, गाउट (अस्थीरोग) , जंतुनाशक, हृदयरोग, सर्दी, उच्च रक्तदाब, त्वचारोग, पित्त्ताचे खडे होणे, ह्यावर गुणकारी आहे. 

लिंबाच्या सालीला सुंदर वास असतो, म्हणून त्याचा उपयोग सौदर्य प्रसधनात सुवासा साठी करतात. तसेच त्याचे तेल, रस फेस पँक साठी वापरतात, तसेच ग्लिसरीन व लिंबाचा समप्रमाणात घेवून पायाला रात्री चोळल्यास पायाच्या भेगा नष्ट होतात. 

दह्यात लिंबू  रस मिसळून लावल्यास त्वचा मुलायम होते. 

लिंबाच सरबत, लिंबाचा लोणचं, टाँफी, कँन्ड्डी असे खाद्यपदार्थ  बनवण्यासाठी  वापरतात, 

टीप:  लेख लिहिताना अभ्यासपूर्ण पुस्तकाची मदत घेतलेली आहे. 

वर्षा पाटील. ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4