2)दरवळ
आंबोली रंग व गडद राँयल ब्लुवर हिरवाकंच पाचूनी भरलेला पदर आशूच्या आईला साडी फारच आवडली.आशूसाठी आणलेला फ्राॅक आशूच्या आईच्या ताब्यात देत केतकी त्यांना म्हणाली या रविवारी आशूला तयार ठेवा.
शनीवारी संध्याकाळी केतकी ने येताना ब्लाऊज,गजरे,नी मेंहदी कोन घेवून आली.जेवण आटपून तिने आशूला हाक मारली,ब्लाऊजची टा्य
ट्ट्रायल मारली, छान बसला होता.मग आशूच्या हाताला मेहंदी काढली,आणि कितीतरी तास स्वताचे हात त्या मेंहदी कोरण्यात बिझी ठेवले. सकाळी उठून केतकी ने हात न्याहाळले, मेंदी किती गडद झाली होती.....
चार वाजता पूर्ण तयार होवून ती बाहेर आली आशूला हाक मारली,आशूची आई आंबोलीचा गजरा घेवून बाहेर आली. अहो काकू आहे माझ्या केसात मोगर्याचा गजरा .अगं हा म़ॅचिंग आहे करत केतकी ने केलेल्या छान हेअर स्टाईल वर तिने गजरा गुंफला.किती सूंदर दिसतेस,! आशूची आई उद्गारली, थांब! दृष्ट काढते करत स्वताच्या केसातील गु़ंता व अंगणातील दोन खडे घेवून केतकी वरून ओवाळले,नी पाण्यात सोडून दिले,आपल्या डोळ्यातील काजळ केतकीच्या कानामागे लावलं,काकू काहीतरीच तुमचं करत केतकी गाडी काढायला गेली...एवढ्यात आशू घरातून बाहेर धावत आली ती फ्राॅक मध्ये खूपच सूंदर दिसत होती.
केतकी ने आज स्कूटी न काढता स्वताची गाडी बाहेर काढली......
दरवळ
क्रमशःभाग2
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा