3दरवळ
गाडी पार्क करून उतरताच, एन्ट्रन्स जवळ बुके वाला होता, त्याने ओळख कन्फर्म करून बुके देवून निघून गेला, तेवढ्यात मोठी व पाँश गाडी तीथे आली, आशूचा हात पकडून केतकी आत जायला वळणार तोच मागून आवाज आला केतकी थांब !तिने मागे वळून पाहिलं, सगळे मित्र लग्नात असणारच होते, तसा जतीनही असणार होता, हां! तोच होता! त्याच्या पाठोपाठ त्याची बायको उतरली,गोरीपान भरजरी साडी, अंगावर भरपुर दागिने लठ्ठपणा किंवा श्रींमती प्रत्येक बाजूने ओसंडून वाहत होती. तिच्या मागून आशूच्या थोडा लहान मुलगा गाडीतून उतरला, मुलगा तसाच गोरापान गोंडस होता. ती जवळ येताच जतीनने केतकीची बायकोशी ओळख करून दिली. तीही हस्तोंलदन करून मोकळेपणाने हसली. बोलत बोलत सर्व हाँल मध्ये आली. राधा जतिन ची बायको जरा येते मी तूम्ही बोला करून समोरच उभ्या असलेल्या बायकांच्या गराड्यात सहज घुसली. तीन खुर्च्या पाहून आशू, केतकी, व, जतिन स्थानापन्न झाले. तूझी बायको सहज मिसळते सगळ्यात त्यावर जतिन हसला, म्हणाला नाही ती मुळीच कुणातही मिसळत नाही. ती तुझ्याबरोबर गप्पा मारत थांबली का? नाही ती श्रीमंत बापाची मुलगी आणि श्रीमंत नवर्याची घमेंडी बायको आहे. तो सर्व किटी पार्टीचा तिचा ग्रुप आहे, त्या सर्व नवरीकडील तिच्या मैत्रीणी आहेत आणि दिवसभर आता ती त्यांच्यातच असेल, एव्हाना आशू आणि साहिल जतिनचा मुलगा. ह्यांच्यात मैत्री झाली व ते खेळायला निघून गेले.
क्रमशः भाग 3
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा