4)दरवळ


 जतिन म्हणाला मी आणि माझी  बायको  कार्यक्रम वाटून घेतो, बरेचसे माझ्या मित्रांचे कार्यक्रम  मी अँटेन्ड करतो, तिच्या मैत्रिणींचे ती करते,  दोघांनी सर्व कार्यक्रम  एकत्र  अँटेन्ड    करणं कामा अभावी  शक्य नाही. आणि क्वचित आम्ही दोघं  कार्यक्रमाला एकत्रीत उपस्थित  राहतो. ह्या लग्नाचे आमत्रंण द्यायला येताना मकरंद ने तू लग्नाला येशील तेव्हा नक्कि  ये.  तू नक्की भेटशील म्हणाला, आज रात्री बारा पर्यंत  मी सर्व कामाला रजा दिली ती फक्त तूला भेटण्यासाठी  !जतिन दिलखुलास, मोकळेपणाने  बोलत होता,पण तो केतकीला भूतकाळात डोकावू देत नव्हता, बोलता,  बोलता तो थांबला वेटरने आणलेल्या कोल्ड ड्रिंक चे दोन ग्लास उचलले, व एक केतकीच्या  हातात देत म्हणाला  आज तू किती सुंदर दिसतेस माहीत आहे,  मंडपातील नवरी पेक्षाही सुंदर, ! ज्या दिवशी  मी तूला प्रपोज केलं त्या दिवशीही तू न नटताही अशीच सूंदर भासली होतीस, केतकी हसली, तू जे काही बोलतोस, ते बोलायला तुझी बायको तूला परमीशन देते का? म्हणजे तिला असं बोललेलं चालत का?  नाही ग! ती टिपीकल बायकांसारखीच आहे, पण लग्नात खूप सारी लोक भेटणार तर अशावेळी चालवून घेते.काय करेल? तेवढ्यात अक्षता वाटणारा  मुलगा  दोघांच्या हातात अक्षता देवून गेला....

मकरंद, केतकी आणि जतिनचे सामायिक  मित्र, मैत्रिणींचा ग्रुप  आला. आणि दोघांच्या गप्पात खंड पडून सर्वांनी एकमेंकाशी  हस्तादोंलन करून, गप्पा सुरु केल्या एवढ्यात मंगलाष्टके  सुरू झाली.....

 सर्वच जण असे खूप वर्षानी भेटले होते, त्यामुळे सर्वांना  एकमेकांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यामुळे  सर्व गप्पात एकमेकांचे अँड्रेस  फोन नंबर. दिले,  घेतले, कोण कुठे जाँब करतंय ह्याची ऊहापोह  झाली. 

जतीनला तू सांग तुझ्याबद्दल काहीतरी जतीनच्य मित्रानी विचारले,  त्याने सांगायला सुरुवात केली,  माझे सासरे माझ काँलेज पुर्ण  झाले तेव्हा वडिलांना भेटायला घरी आले. वडिल बँक मॅनेजर तेव्हा कोणकोणत्या स्कीम मधून त्यांना  बँकेकडून  कर्ज घेता येईल ह्यावर त्यांना सल्लामसलत करायची होती,  कर्ज  मोठ होतं,  वडिल रिस्क घ्यायला  तयार नव्हते.  वडिल  कर्ज  सँक्शंन करायला तयार नव्हते. मग त्यांनीच एक प्रपोजल टाकलं,  पैसे फिटेपर्यत तूमचा मुलगा माझ्या प्रोजेक्ट  मध्ये असिस्टंटच काम करेलं, तो बिझनेस  मध्ये पारंगत होईल, आणि पैसे डुबून तूम्ही अडचणीत  येणार नाहीत. मी तयार आहे म्हटल्यावर वडिल तयार झाले. तसं तर मी बँकेत क्लर्क /आँफीसर असंच असतो ना?  दोन वर्षानी त्यांच कर्ज फिटले, मी बर्‍याच  कामात तरबेज झालो, मला कुणाच्याही  हातातली बाहुली बनायचं नव्हतं/माझा मी  स्वतंत्र व्यवसाय सुरू  केला फार त्रास सहन करावा लागला नाही. आज 10 वर्षानी माझी स्वताची कट्रक्शन  कंपनी आहे, आपण सर्व  एक दिवस माझ्या फार्महाऊसवर पार्टी   करूयात, तेवढयात आशू व साहिल दोघं धावत आले, आशूच्या फ्राँकवर आईस क्रिम सांडलं  होतं म्हणून  केतकी तिला वाँशरूम  मध्ये घेवून गेली. 

थोड्याच वेळात गिफ्ट बाँक्स घेवून आलेला मुलगा केतकीला शोधत तिथे आला. त्याने गिफ्ट  आधीचे आहेर ठेवले होते तिथे ठेवले, व केतकीची वाट पहात तिथे थांबला केतकीच्या एका मित्राने बिल रिसीट आहे का ?पाहू दे म्हणाला त्याची किंमत पाहून हैराण झाला. 5000/-चं गिफ्ट बरंय म्हटलं तितक्यात  केतकी आली, वाँरंटी कार्ड पेपर देवून तो मुलगा निघून गेला .तेवढ्यात एका मैत्रिणीने विचारले,  आम्ही कुठे काय स्थिरावर झालो. ते सांगितलं पण तू काहीच बोलली नाहीस तेवढ्यात एक मित्र म्हणाला मला ठावूक आहे, केतकी छान कविता लेख लिहीते, होना मी वाचलंय तूच लिहीतेस ना? आपल्या काँलेजच्य अंकात सुद्धा तू लिहायचीस ना? केतकी छान हसली, म्हणाली काही सुचलं की लिहीते,, स्टाफ पैकी कुणीतरी इतर बातम्या बरोबंर  टाकतं छापायला ,एव्हाना रिसेप्शन  साठी लाईन लागली होती. जतिन बायकोला बोलवायला गेला. प्रत्येकजण लाईनमध्ये उभे  राहीले दुपार पासून बुके सांभाळून कंटाळलेली केतकी बुके, इन्व्हलप  ग्रिटींग  देवून हुश्य केलं, सर्व ग्रुपने अगदी हसत खेळत चेष्टा मस्करी  करत जेवण केल 10 वाजून गेले होते. सर्व  घरी जायला निघाले, केतकीही  जायला  निघाली जतीनने तिला थांबवलं, मला वराती बरोबर जायचं आहे, तूही थांब अजून थोडावेळ  आशूला खेळायला साहिल होताच त्या मूळे तीही  थांबली, जतिन म्हणाला  आता तू ग्रुप सोडून  जायचं नाहीस  आपल्यातील कुणाकडेही काहीही कार्यक्रम  असो तू यायचं आहेस आम्ही तूझयाशी contact होत नाही  म्हणून  तूझ्या जुन्या  घरी गेलो मी आणि मकरंद  आणि तूझा इथला पत्ता घेवून  आलो,  ती म्हणाली तू माझ्या  आई बाबांना  भेटलास, तो हो म्हणाला काही म्हणाले आई बाबा,नाही, काय म्हणणार? फक्त आशिर्वाद  दिले आयुष्यवंत हो म्हणाले,  तूला ओळखलं  त्यांनी ? माहीत नाही आम्ही नाव नाही सांगितली.   पण पत्ता घेवून आलो.  

माझ्या कडे ऐश्वर्य  आहे, नाव आहे, अभिमान बाळगावा असं चारित्र्य संपन्न जिवन आहे, आई बाबांचा आशिर्वाद आहे,  सुंदर सुशील बायको आहे, पण तरीही जीवनात मला तुझी कमरता जाणवते,  तू असतीस तर माझं जीवन  कसं असतं ते माहीत नाही. तरी सुद्धा माझ्या पहिल्या प्रेमाची कमतरता  मला जाणवते,.

केतकी हसली म्हणाली  तुझी बायको खूपच चांगली निघाली,  तिने अख्खा दिवस तूला माझ्या बरोबर घालवू दिला, त्यावर जतिन  हसला तिला कुठे ठावूक आहे माझ्या  काँलेजचे दिवस  मी कामात हुशार आहे म्हटल्यावर  तीचे वडिल तिला साईटवर घेवून  यायचे, आमची ओळख कामानिमित्त  झाली.  त्यांनी  कर्ज उतरल्यावर सर्वात  आधी मुलीसाठी माझ्या  वडिलांकडे  प्रपोजल टाकले, आईला मात्र तूच हवी होतीस सून म्हणून .. ..

आशू झोपली तशी केतकी म्हणाली निघते मी आता . ... 

 जतिन गाडीपर्यत सोडायला आला , नीट जा म्हणाला.. . 

 10 वर्षापूर्वीची  वादळ कुरेदून ..... 

आशूला मागच्या सीटवर झोपवून  केतकीने  गाडी सुसाट सोडली. ....  

क्रमश :

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4