5) दरवळ


केतकी  घरी पोहचली,  तेव्हा रात्रीचे 11:30ल वाजले होते.केतकी जाताना जितकी छान दिसत होती तितकीच आतासूद्धा दिसत होती. तिने आशूला काकू कडे दिलं आणि  घरात आली. कपडे चेंज करून फ्रेश होवून ती झोपायला गेली, पण तीला झोप येत नव्हती. ती उठली, तिने बाल्कनीतील दिवा लावला व आराम खुर्चीत बसली.आज ती छान कार्यक्रम  अटेंड  करून आली होती तसे कार्यक्रम  ती कामा निमित्त  करतच होती पण  आज तिला तिचे मित्र भेटून ही ती खूश नव्हती.  आता मात्र तिचं मन कशातच लागत नव्हतं,  तीने पुस्तक वाचायला घेतलं आणि शांत गंभीर रात्री  ती पुस्तका  बरोबर आपल्या भूतकाळाची पाने उलटू लागली. ...

ग्रॅज्युएशन झाल्यावर ती आणि तिचा सर्व क्लास पिकनिकला ग़ेले, अर्थात त्यात मकरंद आणि जतिन होता.त्या दिवशी जतिनने मकरंदला बरोबर घेवून  तिला प्रपोज केले, तसे दोघं एकमेकांना अनुरूप होते,दोन्ही घरेही सुखवस्तू  कुटूंबातील  होती. जतिनच्या घरात तर केतकीला ओळखतही होते, तिला नकार द्यायला काही कारण नव्हतं तरी तीला लगेच लग्न वगैरे करायचं नव्हतं तीने  आधी आपण सेटल तर होवूयात मग बघता येईल. म्हणून गोष्ट टाळली...

केतकीला पूढे अभ्यास चालू ठेवायचा होता. तिला आय ए एस आँफीसर बनायचं होतं,  तिच्या चुलत मामाच्या मुलींच लग्न होतं आणि ते सहपरिवार मामाकडे  जायला निघाले, 

काँलेज संपल आणि मकरंद आणि जतिनचं हाँस्टेल लाईफही संपल ते त्यांच्या  गावाला जायला निघाले, पण त्या  आधी  त्यांना  केतकीलाही भेटायचं होतं, ते केतकीला भेटण्यासाठी  घरी गेले, पण केतकीच्या घराला टाळ होतं. शेजार्आनी सांगितल आठ दिवस तरी ते येणार नव्हते. 8 दिवस काँलेज संपल्यावर थांबण  दोघांना शक्य नव्हतं. 

लग्नात केतकी छानच दिसत होती. नुकतच काँलेज संपल होतं व लग्न  जवळच्याच नातेवाईकांत होतं त्यामुळे  केतकी सर्वत्र उत्साहात वावरत होती. त्यामुळे  ती पटकन उठून दिसत होती. आईला मामा अगदी जवळचा होता. म्हणून  तिची आईही  खूप  मामीला कार्यात मदत करत होती. मामाच्या मित्राला व त्याच्या बायकोला केतकी खूप आवडली.  तिच सूंदर दिसणं लोभस वाटणं, सर्वांशी आवर्जून बोलणं, सर्वांच लक्ष वेधून घेत होत,  पण लग्नात पटकन असा विषय काढण्याआगोदर ती काय करते. वगैरे  माहीती त्यांना हवी होती. केतकी तिचे आई बाबा आठ दिवस तिथेच राहणार होते. मामाच्या मित्राने दोन दिवसाने येतो तूला भेटायला म्हणून लग्नातून घरी जाताना सांगून गेला. लग्नघर  मुलीचे होते,तेव्हा दोन दिवसात पाहुणे मंडळी निघून गेली. तिसर्या दिवशी संध्याकाळी मामाचे मित्र व त्यांची पत्नी घरी आले. मामाला ते काही कामानिमित्तच आले असणार हे कळलं पण काय काम असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता, आगत स्वागत झालं छान गप्पा  झाल्या, मग घराच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी म्हणून मामा व त्याचा मित्र  गेला. फिरून आल्यावर मामा अतिशय खूष झाला. मित्राची बायकोही अतिशय आत्मियतेने बोलत होती.  केतकीची शिक्षण, आवड,  सार्याची चौकशी केली. त्यांना  घेवून त्यांच्या गाडीपर्यत  मामी बरोबर केतकीही गेली. ते गेल्यावर शेजारच्या  मुलीशी  केतकी गप्पा  मारत थांबली, तेवढ्या वेळात मामाने मित्र व त्याची पत्नी का आले ते मामीला व केतकीच्या आईला सांगितले .त्यांचा मुलगा चार महिन्यांनी अमेरीकेतून परत येणार होता. त्यांना केतकी चे स्थळ हातचे जावू द्यायचे नव्हते. म्हणून मामांकडून त्यांना शब्द हवा होता. मुलगा  उच्चशिक्षित ,ओळखीतला,रूबाबदार,एकूलता एक होता.  मित्र मामाचा चांगला मित्रच नव्हता तर भावासारखा होता, त्यामुळे  मामाला हे स्थळ हातचे जावू द्यायचे नव्हते.. .. ..

क्रमशः 

वर्षा पाटील ©️®️🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4