खंड २रा टाईम मशीन भाग ८
आपण रामाला देव मानतो,त्याने आपल्या प्रजेसाठी इतकं सुंदर राज्य तयार केलं,की जनता रामराज्य येवू देत म्हणून गौरवू लागले त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा प्रभाव त्याने जनतेवर होवू दिला नाही.
पण त्याने आपल्या प्रिय पत्नी वर अन्याय केला . मुळात संशयाला जागा नाही तिथे संशय घेतला,ती रावणाच्या महालात न राहता वनात राहीली.एका कथेनूसार रावण आपल्या मुलीला लंकेत घेवुन गेला होता.
दुसर्या वेळेला तर ती मुलांसह ऋषींच्या आश्रमात राहीली होती,तिथे संशय घेतल्याने तो आरोप ऋषींवर जातो.आणि असं काही नसताना आरोप करून सोडणं हे निव्वळ सुड घेणं किंवा सितेला तिचं वैवाहीक जिवन,, ऐश्वर्य मिळू न देणं इतकाच हेतू होता.व तो रामाने नाहीतर जनतेचा कौल होता.व रामाने तो मान्य केला.
ऋषींच्या आदेशावरून राम व लक्ष्मण शरयू नदीत चालत गेले.त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे पापक्षालन म्हणून त्यांना शरयू नदीत चालत जावं लागलं, असेल का?कारण राजाला सर्व कला अवगत असणं अपरीहार्य होत. असं असताना दोघाना पोहता येत असणार !मग ते नदीत चालत गेले म्हणजे आताच्या कलीयुगीन भाषेत सितेचा अपघाती मृत्यु (दरीत पडून)/ तिघांचींही आत्महत्या?
एक चुकून झालेली मानवी शिकार(वध) नंतर दोन निराश्रित मृत्यु व एक शाप वाणी त्यातून तयार झालेलं कथानक.
जेव्हा आपण माझा संसार मी करणार असं कलीयुगात ठरवतो,सत्य युगातील रामराज्यातल्या केव्हढ्या घटना टाळून सूखी संसार करायचा असतो,जे राजांना, देवांना चुकले नाहीत ते भोग आपण टाळून नेटाने संसार करायचा. म्हणजे च एक दिव्य पार पाडायचं,मुलगी संसार करायला चालली की पहाडा सारखा बाप ही ढाळसतो
क्रमशः
वर्षा पाटील©®.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा