खंड २ टाईम मशीन भाग ३
चंद्रगुप्त मौर्य व चाणाक्य अशा गुरु शिष्याच्या जोडीने सर्व विनाशकारी गोष्टी राज्यातून काढून नविन राज्याची स्थापना केली. तशाच आणखी एका जोडीने नवराष्टाची उभारणी केली.राज्यात अराजकता माजली असताना देशाची धूरी सांभाळण्यास कोणी नाही हे पाहताना आपणच ते कार्य हाती घेतले पाहीजे हे त्या माऊलीने जाणले.व त्याच वेळी तीने आपल्या मुलाला राजा बनवण्याचे निश्चित केले. ती माउली जिजाऊ होती व ज्या मुलाने आपला देश परकियांच्या जुलमातून सोडविण्याचे स्वप्न सत्यात उतरवले ते शिवराय होते. शिवरायांना तयार करताना जिजाऊ एकट्या होत्या.त्यांचे धनी शहाजीराजे हे परकीयांची चाकरी करत होते.शिवरायांना तयार करा़यला त्यांनाही साधारण ८-१०वर्षाचा काळ द्यावा लागला.म्हणजेच वर्तमानात एखादी घटना दुरूस्त करायचे म्हटलें तरी ती भविष्याची तजवीज होते.
शिवरायांनी स्त्रीवरील अत्याचार तिची होणारी अवहेलना थांबवली.त्यानां मान देवून ,गौरवून नविन आदर्श घालून दिला.घराणेशाहीचे वाद हे जिजाऊ व शहाजीराजे ह्यांच्या लग्नाच्या वेळी विकोपाला गेले होते. अशा अनेक घरेलु अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले.तसे वाद शिवरायांनी मुळातून उपटून टाकले.आपले राज्य मोठे कसे होईल.ह्यावर लक्ष केंद्रित केले.व एक आदर्श राजा कसा असावा ह्याचे उदाहरण घालुन दिले. ते वडिलांची राजगादी घेवून जन्माला आले नाहीत.त्यांनी शून्यातून स्वताचे राज्य तयार केले.व रयतेचे राज्य म्हणवले.
ब्राम्हणांनी मंत्र उच्चारावेत, वेद पठण करावेत पण हाती शस्त्र घेण्याचे स्वप्न बाळगू नये,ह्या वाक्याचा शिरच्छेद करून पेशव्यांनी राज्य करून दाखवले,मुसद्दीने लढ्याय जिंकून दाखवल्या.धचा मा करणारी आनंदीबाई,पुतण्याच्या वध, आणि बाजीरावाची मस्तानी हे आदर्श पेशवेकालीन इतिहासाला लागलेले गालबोट.
राजा पौरव(पुरू)ने तर जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर शी दोन हात केले.
अकबराशी लढाय्या केलेला राजा महाराणा प्रताप असे अनेक आदर्श राजे हे भारतीय संस्कृतीचे अनुकरण प्रिय राजे.त्यांनी इतिहास घडवला.मागे वळून पहाताना असे एकापेक्षा एक शुर राजे घडून गेलेल्या भूमीत, कौरवांच्या झुंडी दिसत आहेत,पण बेबस, कृष्ण धावा करणार्या द्रोपदी न दिसता,,तूही असाच गोपिकांबरोबर रासलिला करतोस ना विचारणारा ललना दिसत आहेत. धनानंद सारखे राजे विलासी जिवन जगत आहेत. फक्त चाणक्य आणि जिजाऊ व्हायला कुणी तयार नाही.आंनदीबाई आणि मस्तानी सर्वच आहेत.फक्त कुणालाही पेशवीन बाई व्हायला नको.सर्व सुधारायला टाईम मशीन हवी.पण आदर्श वाद नको.
क्रमशःभाग ३
वर्षा प्र पाटील.©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा