खंड 2 रा टाईम मशीन भाग 10
जंगल तोड, जमिनीची धूप, भूकंप, सुनामी, डोंगर खोदकाम, ह्याने निसरंगाचा समतोल ढळू लागला, ऋतु चक्र बिघडू लागली. आणि माणसाला पृथ्वी नष्ट झाली तर .. अशी भिती वाटू लागली, त्यासाठी तो नवनवीन ग्रहांचा अभ्यास करू लागला. हे करत असताना अगदी पृथ्वी च्या उत्पती पासूनचा अभ्यास सुरू केला. हे करताना त्याला जाणवलं, पूर्वी ही अनेक सुनामी वादळे, भूकंप येवून अनेक अजस्त्र जीवसृष्टी संपुष्टात आलीय, परत जीवसृष्टी तयार होवून नविन प्रगती करता आलीय. निसर्गाचा समतोल ढळू न देता पृथ्वीच रक्षण करता येवू शकत. अनादी काळापासून करत असलेल्या उपायांचा अभ्यास सुरु झाला, चूका दुरूस्त करून जास्तीत जास्त नैसर्गिक समतोल राखू शकतो,हे लक्षात घेवून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. जसं की र्हास होणार्या प्राणी मात्रांचा जीव वाचवणं, वृक्षारोपण करणं, लोकसंख्या आटोक्यालंत ठेवणं, जमिनीची धूप न होवू देणं, गड किल्ल्या चा अस्तित्व टिकवणं, इ़
पण हे करताना एक दोन देश एकत्र येवून करणं शक्य नव्हतं, म्हणून जागतिकरण(जगने एकत्र येवून काही करणे़) करायला सुरूवात केली जग वाचवायचे असेल तर जगाने एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत .त्यासाठी नवनवीन संस्था स्थापन केल्या गेल्या़़भविष्यसाठी भूतकाळातील चुका वर्तमानात दुरुस्त करायचे निर्णय जागतिक पातळीवर घेतले गेले, आणि परत एकदा टाईम मशीन चा वापर सुरू झाला,
अज्ञान ,प्रचंड जागतिक लोकसंख्या, चुकीचे संदेश, अधिकाराचा गैरवापर,चूकीच्या माणसाचा वापर, भ्रष्टाचार, योग्य माणुस डावलणे, खरी व योग्य माहिती लपवणे,काम करू न देणे, कामास विरोध, करणे़ अशा अनेक, अनेक अडचणीं टाईम मशीनच्या कामात अडथळे ठरू लागले़ अजिबात माहीती नसलेले, नियम धाब्यावर बसवून वावरू लागले, आणि टाईम मशीनचा वापर नक्की का कशासाठी आणि कसा करायचा हेच लोक विसरू लागली़
आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा निसर्ग हातात घेतो, तेव्हा तो स्वताला व्यवस्थित करण्यासाठी आपले शस्त्र उगारतोच, तेव्हा मात्र निर्सगाचे संर्वधन करणाराही त्याच्या चपेटात येतो़
प्रत्येकने ठरवायचे आपण निसर्ग वाचवत जगायचे की अज्ञान दाखवून निसर्गाला विरोध करत.
सुपरमँन समजून ख़ेळताना अनेक उपद्व्याप करणारी लहान मुलं , पुस्तकातील गुढ वाचून काही लपून छपून उद्योग करणारी मुल, महाविद्यालयात प्रयोग शिकल्यावर ते घरी करून पाहणारी तरुण मुले, आणि टाईम मशीन नक्की असू शकेल का? आणि। असलीच तर तिचा अभ्यास करून आपण तिचा वापर करू शकतो का? आपण चार सहा पिढ्या/४-५ हजार वर्ष मागे जावू शकतो का? आणि गेलं तर कश्या पध्दतीने असा विचार करून कुतूहल पोटी त्यावर प्रायोगिक अभ्यास करणारी सळसळत्या रक्ताची तरूण पिढी काही करते, व काही अघटित घडतं, तेव्हा ती़ व्यक्ती,/तो समूह, एकटाच जबाबदार नसतो. ती पूर्ण पिढी, तो समाज जबाबदार असतो, कारणं, सूता वरुन स्वर्ग गाठणं , व काहीच माहीत नसताना त्यात ढवळाढवळ करणं हे समाजात मुरलेले आहे. एखादा कुणी छान किल्ला बांधत असेल/किंवा चित्र रेखाटन करत असेल, व तो किल्ला भुईसपाट करणं,व ते चित्र विस्कटून टाकणं,अस विध्वंसक विचार करणारे महाभाग प्रत्येक पिढीत असतात.
समाप्त
वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा