खंड२. टाईम मशीन:१



निसर्ग चक्रात अनेक घटना कित्येक वर्षा नंतर परत परत घडत  असतात. अनेक उत्पात घडतात.अनेक उलाढाली होतात.अनेक पिढ्या तयार होत असतात.पण त्यात जे अभ्यासपूर्ण आपली नविन पिढी तयार करतात,त्या करताना त्यात चूका नसतात, त्यांचे अनुकरण त्याच पिढीतील,बाकी सारे करत असतात.कठीण अशा तालमीत आणि कडक अशा नियमात तयार केलेली पिढी मग पूढे पिढ्यान् पिढ्या तशाच त्याच कडक नियमांच्या साच्यात घडत असतात,एखाद्या पिढीत कुणीतरी छोटीशी चूक करतो,ती चूक लपवली जाते, किंवा काही प्रकरण दाबले जातं व तसचं पूढीलपिढी कडे    हस्तांतरित केले जाते.आणि मग पूढील पिढीत त्या चूकीतून जे रसायन तयार होतं अनेक गडबडी तयार होतात,की कडक नियम बंधनातून अशा चूका होवू शकत नाही.मग तसेच्या तसं परत हवं असेल,किंवा ते इतकं अभ्यासपूर्ण असेल की त्याला दुसरा पर्याय नसेल तर मागे जिथे ती चूक घडली असेल तसंच्या तसं आयोजन करून ती चूक दुरूस्त केली जाते.त्यासाठी तज्ञ अभ्यासपूर्ण लोक खर्चली जातात, वेळेचा केव्ह केव्हा एका आख्ख्या नविन पिढीचा नाश होतो पण पूढील कित्येक पिढ.या वाचवायच्या असतील तर ते करणं भाग पडतं.ह्यालाच टाईम मशीनचे उदाहरण म्हणता येईल.

क्रमशः १

 वर्षा  प्र पाटील. ©️®️



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4