खंड २ टाईम मशीन भाग ७




प्रत्येक पिढीत स्त्री ला दुय्यम स्थान दिलेले आहे..रामाला वनवास दिला तेव्हा त्याच्याबरोबर जायला सितेला व लक्ष्मणाला परवानगी मिळाली,पण लक्ष्मण पत्नी उर्मिलेला मिळाली नाही.तिला वरीष्ठांची सेवा करण्यास अयोध्येत च रहावे लागले, तिथे तिच्या इच्छेचा प्रश्न नव्हता.तिला पतीचा विरह सहन करावा लागला.रावणाने  सितेचे हरण केल्यानंतर  तिलाही पतीचा विरह सहन करावा लागला.ते कमी म्हणून की काय अयोध्येत परत आल्यानंतर नगरवासीयांनी संशय घेतला ह्या कारणाने परत एकदा तिला पती विरह सहन करून ऋषीमुनींच्या आश्रमात रहावे लागले. ह्यावेळी तिच्या मुलांना प्रशिक्षण मिळाले असले तरी वडिलांच्या प्रेमाला मुकावं लागले. राजकुमार असूनही त्यांना पितृछत्र मिळाले नाही. मुलांना ऋषींनी त्यांच्या वडिलांची कथा सांगितल्यावर राजपुत्र अयोध्येत गेले, त्यांचे तिथे स्वागत झाले, राजपुत्र म्हणून रामाने त्यांचा स्वीकार केला.परत सीतेला आपले राजमहाली जीवन मिळेल असे वाटले, पण परत एकदा तिला अग्नीपरिक्षा द्यायला सांगितले.पुत्रांचा स्विकार केल्यानंतर  मग संशय कसला?नगरवासीयांच्या नावाखाली रामाने एका राजकन्येची एका राणीची अव्हेलना केली.ती भूमी कन्या होती.तिची अव्हेलना सहन न होवून धरतीने तिला पोटात घेतले.
सितेला ऋषीच्या आश्रमात पाठवण्यापेक्षा तिला परत जनक राजाकडे का जाऊ दिले नाही.?
उर्मिला ही जनक राजाचीच मुलगी होती.जर लवकुश मातेसह तिथे राहिले असते ,तर त्यांना आजोळ,राजेशाही जिवन मिळाले असते.  त्याच बरोबर वडिलांचे नातेवाईक, ह्यांची आजोळी असलेली उठबस  मिळाली असती, कदाचित हट्टाने ते अयोध्येत ही गेले असते. वडिलांना भेटले असते. त्या राजकुमारांना रामासारखाच पितृविरह सहन करावा लागला. आजोळी राजविलासी जिवन लाभल्यानतर वडिलांच्या  घरचे,अयोध्या नगरी पहायचे
वेध लागले नसते.व रामायण गात अयोध्येत गेले नसते.
आणखी एक कारण असं देता येईल रामाला राजकारभार पहायचा /करायचा होता. व मुलांचे ऋषीच्या आश्रमातील शिक्षण आई/वडिलांच्या देखरेखीखाली व्हावे असे सर्वांना वाटले असेल,व ते मान्य करून सितेने आश्रमात राहण्याचे आव्हान  पेलले असेल.पण मागच्या सारखेच संशयाच्या कारणाने तिला अग्नी परिक्षेला सामोरे जावे लागले. परत परत तेच जिवन हे सितेलाही चुकले नाही.
विवाह तुटू नये व तुटलाच तर पून्हा जोडला जावा हे पुरातन काळातही होते.
रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली होती,रामाला अहिल्या शिळा म्हणून सापडली होती. अनेक वानर स्त्रिया त्यांच्या समवेत वावरल्या होत्या रामही सिते शिवाय राहीला होता पण संशय फक्त सितेवर आला होता.
सिता एक राजकन्या होती.ती एक राणी होती.परंतु तिचा पती/तिचे राजविलासी जीवन , तिचे ऐश्वर्य,तिचे वैभव तिला कधीही परत मिळाले नाही.रामायणातही अनंत चुका आहेत आणि टाईम मशीन द्वारे त्या सुधारायचा प्रयत्न केला गेला आहे.


वर्षा पाटील‌©® 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4