खंड २ टाईम मशीन भाग: २
जेव्हा दोन राजघराण्यात लग्न होतात, तेव्हा त्यांची मूळ तपासली जातात.पूढील पिढी तयार करताना ते फार उपयोगाचे असते.,पूढील पिढीत त्यांचे वंशपरंपरागत रोग दुर्गुण येवू नयेत ह्यासाठी ते काळजी घेतात. चांगलं फळ झाडाला यावं म्हणून माळी जसा दोन चांगल्या झाडांची निवड करून कलम करतो.किंवा दोन जातीवंत घोडे एकत्र आणून नविन घोड्यांची पैदास करतात,त्याच निसर्ग नियमाला धरुन दोन राजघराणी एकत्र येवून ,नविन पिढी अधिक कर्तबगार पिढी तयार करतात.पण केव्हा केव्हा कितीही काळजी घेतली तरि एखाद्या रोग किंवा वाईट संगतीने मुलं फूकट जाण असं राजघराण्यात घडतं.जर राजाला मुलं न होणं,किंवा कोणतंही अपंगत्व घेवून जन्माला आलेलं मुल गादीचा वारस ठरू शकत नसेल तर त्यावर मुल दत्तक घेवून उपाय योजले जात,राजा धनानंद ने आपले दुर्गुण न सोडता राज्य करण्याचा निर्णय घेतला,तेव्हा राज्यात अराजकता माजली,व हे लक्षात आणून देणार्या चाणक्याच्या अपमान केला.आपला देश वाचवण्यासाठी चाणक्यांनी चंद्रगुपताला निवडले.राजा म्हणून. त्याला तालमीत तयार केले,त्यासाठी त्याला आपली १०-१२वर्ष खर्च करावी लागली.अविश्रात मेहनत करावी लागली व प्रजेला योग्य व नविन राजा मिळाला.ही चूक एकट्या माणसाने सुधारली व तेव्हा लगेच लक्षात आणून दिली.पण प्रतिकूल परिस्थितीमुळे राजाचा लगेच पाय.उतार न करता भविष्याची वाट पहावी लागली.टाईम मशीन चूका दुरुस्त करण्यासाठी वापरतात.इथे वर्तमानातील ती चूक सुधारण्याचे हाती घेतले.महाभारतात अशा चूका सुधारल्या नाहित.राजा धृतराष्ट हा आंधळा असताना त्याला गादीवर बसवण्यात आले.वरती चूकांवर चुका करून त्यावर पांघरुण घालण्यात आले, आणि त्याची परिणती युद्धात झाली.व सर्व नष्ट झाले.
क्रमशः भाग २
वर्षा पाटील.©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा