खंड २रा टाईम मशीन भाग ६


"रामायणात " ,श्रावण बाळाचा श्राप. राजा दशरथाला पूत्र वियोगाने मरशील हा खरा होवू नये. रामाच्या मृत्यु मुळे राजा दशज्ञरथाचा मृत्यु होवू नये,म्हणून रामाला वनवासात पाठवले. दशरथाचा मृत्यु पुत्र वियोगामुळेच झाला.पण रामाचा मृत्यु टळला.ह्यात पूढे घडणारी घटना तशीच घडली .त्याचे मूळ कारण तसेच ठेवून त्यला सौम्य रूप दिले गेले. ह्यात आई वडिलांची सेवा करणारा श्रावणबाळ ह्याचे पुण्य खूप होते. त्यानी आपल्या  आई वडिलांची केलेली सेवा व भक्ती ह्या मुळे त्याचा शाप खरा होणार होता.व ते टाळण्यासाठी रामाला वनवास व राजा दशरथाला मृत्यु देवून.शापही खोटा ठरणार नाही.व रामाचा मृत्यु ही होणार नाही हे करविले. ह्यात आलेल्या अडचणींवर मार्ग शोधला.हयात टाईम मशीनचा प्रश्न आलाच कुठे?

आपण गृहीत धरले राम हा साधा राजपूत्र आहे.शापाने त्याचा मृत्यू झाला. व वियोगाने  राजा दशरथाचा मृत्यु झाला.तर ती एक साधी कथा झाली असती.रामायण घडले नसते.व राम "देव" अवतार झाला नसता. 

किंवा राम प्रिय मुलगा तसाच ठेवून इतर मुलाचा  मृत्यु घडवून(हत्या, विषप्राशन इ.) दशरथाचा मृत्यु पुत्र वियोगाने घडवला असता,तर कदाचित राजा दशरथाला इतके दु:ख झाले नसते.व राजा दशरथाचा मृत्युच झाला नसता. व अकारण राज घराण्यात एक हत्या होवून गालबोट लागले असते.राम राजा होवून सर्वसामान्य राज्य झाले असते.व रावण वध व रामायण घडले नसते.

त्यामुळे रामाचा वनवास योग्य होता.व तो अचूक निर्णय होता.पिढ्यान पिढ्या रामायणाचे गोडवे गायले गेले.कारण तरुण मुलाचा मृत्यू त्यात टाळला गेला.व वृद्धावस्थेत राजा दशरथाचा मृत्यु झाला .लोक घरात सुख समृद्धी,शांती नादांवी व अकाली म‌त्यु घडू नये.म्हणून घरात रामराज्य असावे.म्हणू लागली.ह्या प्रकरणात टाईम मशीन ची गरजच पडू नये.इतका निर्णय बरोबर आहे.

 दशरथाला जर पुत्र वियोगच द्यायचा होता.तर रामाला  राजा जनका कडे पाठवले, असते व पूत्रवियोग घडवता आला असता,रावण खूप दूर होता,व सितेचे हरण झाले नसते. रामाला वनवासात ऋषींनी त्यांचे होम नष्ट करणारे राक्षस मारण्याकरीता बोलवले होते.

अचूक निर्णयात टाईम मशीन कित्येक पिढ्यांना लागत नाही.

क्रमशः

वर्षा पाटील.©®


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4