खंड २ टाईम मशीन भाग:४




महाभारतातील मुळ वंशज राजा नहुष व त्यांच्या ७पुत्रापैकी दुसरा राजा ययाती होय. .राजा भरत हा वंशवेलीतील १९ वा वंशज,१८ वा राजा  दृशंत्य व शकूतंला चा मुलगा राजा भरत. म्हणून त्या कथेला भरत नाव पडलं व कथा मोठी झाली,म्हणून तिला महाभारत नाव पडले.वंशवेल लिहीताना राजा कुरूपासूनच लिहीली जाते. राजा कुरु हा २६वा राजा तर राजा शंतनु हा ३३वा राजा.राजा शांतनुला दोन पत्नी गंगा तिचा पुत्र भिष्म,व दुसरी सत्यवती तीची दोन,पहिला चित्रांगद व दूसरा विचित्रविर्य भिष्माने लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली,अंबिका व अंबालिका पासून राजा धृतराष्ट व राजा पाण्डू हे पुत्र होत.
धृतराष्ट्र व  गांधारी पासून १००पुत्र व पाण्डू व कुंतीचे पांडव पूत्र होत.
धृतराष्ट्र हा आंधळा असला तरी, कुरू वंशातील खरा वंशज त्यामुळे कौरव खरे वंशज व गादीचे खरे वारसदार
 ठरतात.पाण्डू हा देखिल खरा वंशज होता, पण पाण्डू राजाला शाप असल्याने तो आपल्या पत्नींन बरोबर प्रणय करु शकत नव्हता,व त्यामुळे पाचही पुत्र हे कुरु वंशीय नाहीत.ही बाब बाजूला ठेवली तर पाच पुत्रांना जो नियम लावला तो सूर्य पूत्र कर्णाला लावला तर कर्ण हा सर्वात मोठा पुत्र व तो काका कडे होता.व राज्य त्यांचे म्हणजेच कौरवांचे होते.व तेच वंशवेलीतील खरे वारसदार होते,मग गादी साठी युद्ध का झाले,व श्री कृष्णाने पांडवांची बाजू का घेतली.
एक तर पांडव सर्व विद्येत सरस होते,आज्ञाधारी होते,सर्वगुण संपन्न होते.
शकूनी हा कौरवाकडे होता व तो कुरू वंशाचा नाश करायला आला होता,श्रीकृष्णाला हे टाळायचे होते.
गादीवर भिष्म बसले नसले तरी त्यांचाही तेवढाच हक्क होता,व त्याना पांडव प्रिय होते.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता वंशवेलीचा  विचार न करता भविष्याचा विचार करून टाईम मशीनचा वापर केला होता, युद्धाची चुक सुधारुन परत अर्जुन पुत्र अभिमन्यू सुरक्षित ठेवून टाईम. मशीन द्वारे भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 

वर्षा पाटील.©®


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4