भाग 1
आज शनीवार होता हाफ डे होता.आणि अचानक मुग्धाला लक्षात आलं आपल्या काॅलेजच गेट टुगेदर उद्या आहे.आणि तीला सगळी तयारी घरी जावून करायची होती. आपण कसे विसरलो म्हणून ती उगाचच चरफडली.पटकन डबा पॅक करून ऑफीस मधून बाहेर पडली. गाडीला किक मारून तीने सर्व माॅल गाठला.सगळ्यात आधी छान ड्रेस घेतला.आणखी थोडी खरेदी करून ती घरी पोहचली तीने केसांना छान पॅक लावला आणि मग ड्रेसवर मॅचींग सॅडल पासून सर्व तयार केल. मग उपसलेल्या सर्व वस्तू लावे पर्यत वेळ कधी गेला कळलाच नाही .मग छान वाॅश घेवून आली. तिथपर्यत आईने जेवण तयार ठेवलंच होतं. जेवण झाल्यावर आईला तिने सांगितलं मला किचन रिकाम हवयं. तीने किचनचा ताबा घेतला एका कडे केकची तयारी करतानाच दूसरीकडे तीने पिस्ता बिस्किट बनवायला घेतली.आता गेटटुगेदर मध्ये हे असलं म्हणजे जरा अतीच होत तर मुळीच नाही तीच्या मैत्रीणींनची ती फर्माइश होती तीची केकची कृती टेस्ट हटके होती आणि पिस्ता बिस्किट ही तीची आणि तीच्या मैत्रीणीची आवडता स्नॅक होता.दोन रेसीपी करताना तीला दोन तास गेले होते आणि ती आता दमली होती.तीने ओटा तसाच ठेवून केक डेकोरेशन करत बसली त्यात मात्र ती पुर्ण तल्लीन झाली.सर्व आटपून केक झाकून ती झोपायला गेली. सकाळी आवरून तीने सर्व तयारी केली. त्याआधी आपला ग्रुप मधील सर्व नक्की येणार आहेत की नाही.हे कर्नफम केले.
नविन ड्रेस तीला छानच शोभून दिसत होता. तीने आपले स्वीट्स पॅक करून गाडीत भरले.पर्स गाडीच्या मागच्या सीटवर ठेवली. आईला रात्री उशीरा येईन काळजी करू नकोस सांगून गाडी पेट्रोल पंप कडे वळवली. तिथून टर्न घेवून काॅलेजच्या रस्ताला लावताना मंद आवाजात संगीत लावलं...
अर्थात काॅलेजमध्ये मित्रानी छान वेलकम सजावट केली होती.सुदर संगीत लावलं होत.सर्वात आधी सगळ्यानी छान एकमेंकांची चौकशी केली. सगळेच जमे पर्यत दिड वाजून गेला. सगळ्याच्यां गप्पा छान रंगल्या.आणि जसे मुग्धाने स्वीट्स बनवून आणले होते. तसे सर्वानी काहीना काही आणलेच होते.म्हणजे तसे ठरलेच होते. मग सर्वानी भरपेट पदार्थ ची देवाणघेवाण केली.छान एकमेकांच्या रेसीपीचे कौतुक केले.
मग ठरल्याप्रमाणे आधी बैठे मग अगदी काॅलेज ग्राउंड मध्ये धमाल केली.सगळे थकल्यावर काॅलेजकँटिनचा चहा काफी पिवून मग मस्त अंधार पडे पर्यंत गप्पा मारल्या एका शार्ट मुव्ही एजाॅय केला आणि नंतर मग सर्वानी आपला मोर्चा हाॅटेल कडे वळवला. डिनर करून मग आणखी काही वेळ गप्पा मारताना एक विकेन्ड ला शार्टकट ट्रिप करायची भन्नाट आईडीया मिळाली. मनात आल आणि प्लॅन ठरवला.लगेचच लागोपाठ तीन सुट्टयांनचा प्लॅन करून काॅलेजच्या मैत्रीणींचा ग्रुप ने पिकनिकला जायचे ठरविले,त्यात अर्थात, मित्र नसणार होते. मीनी बस मिळाली, नाही आणि ट्रीपचा बेत कॅन्सल करणं सर्वांच्या जीवावर आल.प्रत्येकीच्या घरी गाडी होती. एकूण 15मैत्रीणी होत्या,तीघींनी आपल्या स्वताच्या नवीन गाड्या करायच्या पक्क्या केल्या. ज्यांना लाॅग ड्राइविंगचा अनुभव होता त्यानीं ड्राइविंग करायच ठरवलं.
काॅलेजच्या गेटटुगेदर प्रमाणेच छान प्लॅनींग ठरवलं.
क्रमंश
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा