भेडीया2

तीने अर्थ  पोत गाठ बांधून  ठेवल.आणि मुलांनी बाधलेल्या छोट्या पिशव्या दोन तीन मोठ्या पिशव्यात भरली.लिंब पसरलेली चादर उचलून तिथेच दुसरी चादर पसरवून, आपली दोन मुल आणि नवर्‍यासाठी झोपायला जागा केली.
आणि तिथेच शेजारी आपल्या लहान मुलां पाशी जावून झोपली.
      सकाळी दुध वाल्याने भाभीजी दुध करून दरवाजा वाजवला. तीने आपली पथारी उचलली, नवर्‍याला आवाज दिला. आणि दुधाच टोप उचलून दरवाजा उघडला, आज ज्यादा मांगती 1लीटर डालो, क्यो आज कुछ त्योहार है क्या?नही तो कुछ  मेहमान आनेवाले है क्या?
दुधवाल्या भय्याने विचारले. तीने मानेनेच नाही म्हटले, दुध घेवून आत आली, दुध झाकून ठेवून हातात मशेरी घेतली खसा खसा दात घासले, तोडं धुवून ओट्यावरच्या एक शेगडीचा गॅस पेटवला, दुध तापवलं, चहाच आधण ठेवल. तीतक्यात गल्लीत पाव वाल्याने आवाज दिला.आणि ती परत लगबगीने दारात गेली परत तीने चार लादी दो बोलली, त्या मुलाने "आम्मी" आज दोन लादी ज्यादा क्या?विचारले तीने हामी भरली. अंघोळीच्या पाण्याचे भांड गॅसवर चढवून तीने मुलांना उठवलं ,चादर उचलून मुलांच्या हातावर मशेरी टाकली, बुतारा हातात घेवून दार झाडले, झाडु घेवून  खोली झाडली. आणि पाणी काढून  स्वताची अंघोळ आटपुन घेतली. चहा तापवून चार कपात काढून मुलांना आवाज दिला.नवरा मुल येवून चहा प्यायला बसली प्रत्येकाला एक एक पाव देवून तीने आपल्या लहान मुला कडे आणि त्याच्या बाजूला झोपलेल्या 7-8 वर्षाच्या गोर्यापान मुली कडे कटाक्ष  टाकला, आणि नवर्याला म्हणाली आज मै घरमेच रहती, आज तूम वो तीन पीशवी लेकर लिंबू बेचने जाओ,
मुलांना म्हणाली तुम पुलीस को डरनेका नही, अगर लडकी के बारे मे कुछ पुछा तो बतानेका हमारे घर पेच है. वो अगर मेरेको घर आके पुछेंगे तो मै क्या बतानेका वो बतायेगी. मुलांनी मान डोलावली. बापाने पिशव्या हातात घेतल्या आणि बाहेर पडला, मुलं त्याच्या मागे चालू लागली,तो मुलांना घेवून रेल्वे फाटकाच्या दिशेने चालू लागली.
तीने दार लोटले परत दोन्ही मुलांन कडे कटाक्ष टाकला,मुलीचा तोकडा फ्रॉक उगाचाच सारखा केला आणि  भांडी घासायला गेली...
क्रमशं:2

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4