भाग 7भेडिया
दोनो बच्ची टॉवेल बेचने के लिए जाते समय अपने भाई को साथ लेके गयी. नगमाने लडकी को तैयार किया.दोपहर और रात का खाना तैयार करके दोनो लडकी को लेकर पुलीस स्टेशन गए.....
आज पण पोलिस स्टेशन मध्ये खूप गर्दी होती. नगमा मुलीला घेवून "मुलीला" सुधारगृहातील लोक आलेत का पहायला गेली. पण दोन वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता. दोघे हताश होवून परत आले. संध्याकाळी परत फेरी मारून पाहीली तरी तीच गत.दोन दिवस गेले. आख्खा मोहल्ल्यात ही गोष्ट पसरली. आणि सर्व जण नगमाला मदत करायला धावून आले आता नगमा व तीची शेजारची पोलीस स्टेशन मध्ये फेर्या मारू लागली. आणि अहमद आपल्या मुलांबरोबर लिंब विकायला जावू लागला.
आठवड्याच्या शेवटी सुधारगृहाच्या लोकांची टीम सकाळी पोलीस स्टेशन ला आली. मुलीला नाव विचारल्यावर तीने गुड्डू सांगितले. बाकी तीला सांगता आले नाही.त्याच्या घरी आली तेव्हा मराठीत शब्द बोलत होती.आठ दिवस तीच्या मुलांबरोबर बोलल्यामूळे तीला बरेच हिंदी शब्द येत होते. त्यामुळे तीची नक्की कुठली जात धर्म असावा कळत नव्हता. तीच्या नवर्याची कसून चौकशी केली. आणि मुलीला सुधारगृहात टाकण्याचा निर्णय झाला. नगमाला मुलीचा लळा लागला होता. मोहल्ल्यातून तीला मुलगी न सांभाळण्याच सल्ला दिला जात होता....
नगमा त्या लोकांशी मुद्देसूद ठासून बोलत होती....
क्रमंश भाग 8
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा