भेडीया 3

साधारणतः 9 च्या सुमारास तीने दोघांना उठवलं.स्वताच्या हातात मशेरी घेवून आलटून पालटून त्यां मुलांचे दात घासले. आणि गरम गरम पाण्यात अंघोळी घातल्या. मुलगी मध्येच मम्मा पाहीजे करत होती.आणि नगमा रुक अभीच बुलाती हुॅ म्हणत होती. तीला आपल्या मुलीचा एकुलता एक नवा ड्रेस  घातला.आणि वाटीभर दुधात दोन पाव भिजत घातले.आपल्या चार वर्षां च्या मुलाला बाजूला बसवून तीने दोघांना भरवायला सुरूवात केली. दोन पाव संपले आणि तीने आणखी दोन पाव भिजत घातले. तीच्या मुलाने एक दोन घासात तोंड फिरवले.नकूच म्हटले.उरलेला दुध पाव मुलीला भरवला. गुटगुटीत मुलीची भुक मोठी होती. खेळण्याने भरलेला खोका मुलांसमोर दिला.आणि परत काम आवरायला सुरूवात केली....
मुलीचे मध्ये मध्ये मम्मा पाहीजे बोलणे बंद झाले. आणि ती तीच्या मुलांबरोबर खेळण्यात रमली.....
Varsha Patil.
Bsc.Microbiology

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4