8)दरवळ2/9/21/315
पाहुणे गेल्यावर आईनी सर्व घर ,भांडी आवरायला घेतली. केतकी स्वतःच्या खोलीत दार बंद करून झोपली,आज तिने बरीच आईला मदत केली होती. रात्री जेवताना आईनेच विषय सुरू केला, अग पाहिलंस का? काय गिफ्ट आहे ते,? केतकीने मानेनेच 'नाही' म्हटलं, इन्व्हलप तरी उघडलं की नाही?, तीने चक्क नाही म्हटलं अग ! ते कशाला आले होते? आपण लग्नात भेटलो होतो तरी! काल काय सांंगितल होत तरी नाही का लक्षात आलं तुझ्या केतकीला एकदा वाटलं, सरळ सांगून टाकावं पण जतीनशी तीने कुठे काही ह्या बद्दल बोलली होती. जेवण आटोपल्यावर आई केतकीच्या खोलीत आली दोघींनी गिफ्ट उघडले, त्यात एक साडी मँचिग ब्लाउजपिस, र्डेसपिस ,फळ,
स्वीट, पाककला पुस्तक, मॅचिंग बंँगल्स इ. आई ते पाहुन सुखवून गेली.म्हणाली तुही आमची एकुलती एक मुलगी आहेस आम्हीही तूला हवं नको ते सर्व देवू, ,आईने इनव्हलेप उघडले, राजचे सुंदर रुबाबदार फोटो, पाहून आई खूपच खूश झाली .आता फक्त परीक्षेचं कारण सांगून तू नाही सांगणार आहेस का? केतकीला आता आईला सांगून टाकावं वाटलं आणि ती काही सांगणार तेवढ्यात बाबांनी आईला हाक मारली व नंतर आई काही झोपे पर्यत खोलीत परत आली नाही. व तो विषय तिथेच राहीला.
क्रमशः 8
वर्षा पटील.©®🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा