11 दरवळ


 जतीन वाँशरूम मधून परत येताना त्याने कांउटंरवरून  रूमची चावी घेतली. व तो टेबल कडे वळला. 

जतीन सकाळी लवकर उठून आला होता. त्याने काही खाल्ल असेल की नाही ठावूक नव्हतं आणि परत प्रवास करून जातानाही उशीर होणार होता. म्हणून जतीन येईपर्यंत  पोट भरेल असं स्वताच्या आवडीचं जेवण केतकीने आँर्डर केलं. 

जतीन  आल्यावर खुर्चीवर  बसत म्हणाला बोल आता.. .जेवण येईपर्यत , केतकीने घरातील सर्व परिस्थिती   कथन  केली , लग्न नुकतंच जुळलेलं नाही  तर घरातील तयारी कुठपर्यंत  झाली आहे. आणि आज जर ती परिक्षेला आली नसती तर तिला लग्नाच्या खरेदीला  जायचं होतं, तिचं म्हणणं इतकंच होतं की  तीने मुलाला फक्त फोटोत  पाहील होतं, त्या आधी  तुझ मत अजून  तसंच आहे का  हे मला विचारायचं होतं तसं तर मी तेव्हा तुझ्याशी नीट बोलून  मी माझा निर्णय  सांगितला असता, पण तेव्हा मी नीट तूझ्याशी बोलू शकले नाही.पण मामालाही स्पष्टपणे मला सांगता आलं नाही.  उगाच मी तूला फसवलं असं व्हायला नको, म्हणून भेटायचं ठरवलं.  पंरतु आमचे मामाशी इतके घनिष्ठ संबध आहेत की माझ्या हो नाहीचा प्रश्नच उद्भवत  नाही. आणि नकार देवून माझे आई बाबा त्याला दुखवणारही नाहीत. 

तो  मुलगा बाहेर असतो, म्हणजे स्थिरस्थावर आहे .मग तुझ चांगल होत असताना मी आड का येवू मी तर अजून स्थिरस्थावर सूद्धा झालेलो नाही. त्याच्या अशा बोलण्याने केतकीच्या डोळ्यात चटकन पाणी आलं ती उठायला जाणार इतक्यात जेवण आलं हात धुवायचे आहेत कारण सांगून केतकी उठली तिने जवळच असलेल्या बेसिन मध्ये जावून तोंडावर पाणी मारलं नँपकीनने चेहरा पुसला,व  ती जागेवर येवून बसली. तिलाही काही वाटलं नाही हया अविर्भावात तिने  जेवणास सुरूवात केली. पण ती चमच्याने जेवण चिवडत राहीली. जतीनने मात्र आपल्याला सपाटून भूक लागलेयं सांगून   जेवणावर  ताव मारला.  केतकी मघाशी जे जतिन बोलला त्याने दुखावली, आई बाबानी ठरवलेले  बरोबर   आहे, आपल्याच मनाचे खेळ आहेत समजून ती मनाला शांत करण्याचा प्रयत्न  करायला  लागली. जेवण पूर्ण  होताच जतीनने  तिला म्हटलं  तू आता कशी जाणार आहेस घरी, बसने केतकी उतरली  पण आता दोन तास तुमच्या गावची बस नाही तेव्हा आपण हाँटेलचा परिसर फिरूयात म्हणाला अर्थात केतकी तयार नव्हती पण तिच्याजवळ  पर्याय  नव्हता,  मी तूला तूझ्या घरपर्यत गाडीवर सोडतो, आता भरदुपारचं उन आहे, तेव्हा .....

हाँटेल समुद्रकिनारी होतं व  खूपच आखीव रेखीव बांधलेलं होत.समोरच  अफाट समुद्र, माडाच्या झाडात खेळणारा वारा,  वरती ,प्रशस्त बाल्कनी थोडावेळ तिथे रेंगाळल्यावर आपण दोन खुर्च्या मागवून बाल्कनीत बसुयात का? की थोडावेळ  रूमवर आराम करुयात का? केतकी जतीनकडे पहात बसली, आजचा जतीन तिला वेगळा भासला, ती नको म्हणाली, पण मला खरचं अभिनय  नाही करता येतं, मला  बोलायचं आहे तुझ्याशी,तुझं जमलेलं लग्न नाही तोडायचं मला पण.. ... 

त्याने बोलता बोलता रूमचा दरवाजा उघडला ,अग तू परीक्षेचा अभ्यास करत होतीस, तूला स्पर्धा  परीक्षा द्यायची होती ना ।मग माझ्या ध्यानी मनी नसताना मी  तुझ्या लग्नाची बातमी ऐकू आणी ते अँक्सेप्टही करू, केतकी गोंधळली  मगाशी तर तू म्हणत होतास , ?उद्या माझ्यासारखाच कुणीतरी मुलगा येईल फाॅर्वड  हुशार मुलगी म्हणून आपल्या आई वडीलांच्यावर विश्वासून त्यांनी पसंद केलेल्या मुलीशी डोळे झाकून लग्न करेल आणि ती मुलगी काहीच घडलं नाही अशा आविर्भावात  पुढील संसार  करणार,मग ती कुणाबरोबर हाँटेलमध्ये गेलेली असो अगर तिचं कुणावर प्रेम असो , जतीनचं हे नविन रूप पाहून  सर्द झाली .साँरी म्हणून पर्स उचलुन  चालू  लागली, त्यांनी तिच्या हाताला धरून खेचलं ती बेसावध होती तेहा ती त्याच्या खुर्चीवर बेसावध पडली, त्याचा उष्ण श्वास तिला जाणवला, आपण दोन दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न करतोय  हे तिला जाणवलं  एक तर जतीनला  आपण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे सांगायच  होत किंंवा त्याला कधीही न भेटण्याचा निर्णय  घ्यायचा होता.व आईनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं, तिला  आपल्या भोवती  जतिनच्य हाताची मिठी जाणवली , तिला त्याचा आवेग जाणवला हे स्पर्श तिला नविन होते, त्याचे अर्थही तिला समजत नव्हते, ती हे सर्व कसं घरी सांगणार होती. आणि दोन्ही घटनांना तिच जिम्मेदार असताना कसं तोंड देणार होती़......

जतिनवर  तिचा पूर्ण  विश्वास होता पण तरीही अजाणतेपणी  तिच्याकडून  अक्षम्य अपराध घडला होता. 

तिची बस केव्हाची निघून गेली होती. जे काही तिला जाणवतं होतं ते तिच्यासाठी लज्जास्पद  होतं, तीने भरदुपारी आपलं स्त्रीत्व पणाला लावलं होतं, पणाला अशा साठी की ह् यात एक दरवाजा पूर्ण  बंद झाला होता आणि दुसऱ्यासाठी आपल्या बरोबरच  लढायचं होतं,  आणि हक्कासाठी  पहारा ठेवायचा होता. तिला गलबलून आलं तिने घरी फोन लावला, आईने उचलला अग कसा होत पेपर तिला। बोलताना रडू कोसळत होतं रस्त्यात  अपघात झालाय बस अडकून पडलीय रस्ता कधी मोकळा होईल सांगता येत नाही. मी मध्येच उतरून एका हॉटेलमध्ये फोन करते आहे सांगितलं, आईशी असं ती कधीच खोटं बोलली नव्हती, हे सर्व आपण आपल्या मनाने करतोय प्रेमासाठी की... .तिचं डोक सुन्न झालं विचार करण्याची ताकद नाहीशी  झाली.़़..

जतिन उठला  त्याने तिला जवळ घेतलं एक,  दिड वर्ष  मी असाच बेभरोसा पाय ठेवू नाही शकत मी तुला  दुसर्या बरोबर नाही पाहु शकत मी ह निर्णय  ह्यावर दगड ठेवून घेतलाय मलाही माझ्या घरच्यांना तोंड दाखवायचे आहे. माझ्यावर विश्वास  ठेव.  मी सेटल होईपर्यंत  वाट पहाणार नाही. उद्या त्या  मुलाला नाही  सांग मी माझ्या आईवडिलांना  तयार  करून तुझ्या घरी घेवून येतो, लग्न घरच्याच्या परवानगीने ठरवून मग नंतर सवडीने करू  त्या दिवशी मला उत्तर  दिलं असतं तर ही वेळ आपल्यावर नसती आली... 

एव्हाना  संध्याकाळ उलटून गेली होती, दोघांनी  मोटार  सायकलवर प्रवास सुरू  केला, ...

क्रमशः 

वर्षा   पाटील ©️®️🌹



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4