13 दरवळ
सकाळी मामींनी अग लग्न इतकं घाईत ठरलंय की तुझं चहासाठी बोलवण झालं नाही पण साधनाच लग्न व तुझ लग्नाचं जेवण दोन्ही मिळून मी तूला चिकनची साडी आणलीय ब्लाउजही शिवून आणलाय तेव्हा छान साडी नेस. केतकीला बेबी पिंक कलरची चिकनची साडी खूप आवडली तशी ती मामीला विरोधही करू शकत नव्हती. फ्लाइट 10 वाजता पोहचणार होती. सर्वजण 9 वाजताच तिथे पोहचले. वेटींग पोर्च मध्ये पून्हा एकदा सर्वांच डिस्कशन चालू झालं लग्न कमी वेळात असलं तरी ते अतिशय थाटामाटात असणार होतं, त्यांच्याकडील जवळजवळ सर्व तयारी झाली होती. दोघांची सामाईक खरेदी व दोन चार दिवसात छापून येणार्या पत्रिका वाटप अशी मोजकीच काम राहीली होती. आपण किती अनर्थ केलाय व आपलं काय होईल ह्या कल्पनेनं तिच ह्दय धडधडू लागलंं आताची जर वेळ मारून नेली तर तिच राज बरोबरच लग्न confirm , होईल. पण मग जतीनचं काय?
साधारणपणे 11 वाजता फ्लाईट आली, सामानाची तपासणी होवून ताब्यात मिळे पर्यंत 12 वाजले, राजच्या बाबांनी विमान तळाच्या बाहेर आल्यावर गाड्या जवळच असलेल्या 5⭐हाँटेल मध्ये वळवायला सांगितल्या, वेटींग हाँलमध्ये सर्व थांबून एकत्र जमले तिथे राजच्या आईने राजला सगळ्यांशी ओळख करून दिली. तो केतकीला प्रथमच पहात होता. साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. त्याच्या मंद हसण्यातून त्याला त्याच्या आईची पसंती आवडली होती. जेवणाचे टेबल लागल्यानंतर सर्वाना बोलवले, सर्व गप्पा मारत हसत खेळत वावरत होते, आणि केतकीचे दडपण वाढले, त्याने जेवण संपल्यानंतर आईला मला केतकीची एकटीशी गप्पा मारायच्या आहेत सांगितलं त्यावर हसत हसत त्यानां परमिशन मिळाली बाहेरील काही टेबल्स मांडली होती, तिथे जावून आपण बोलूयात म्हणून राजने सांगितले, पण तिथला टाईम संपलेला आहे 5-10 मिनिटे जास्तीत जास्त असेल असे वेटरने सांगितल्यावर त्याने आईची परमिशन घेवून ते थांबणार असलेली रूमची चावी घेतली. 15-20 मिनिटे त्यांच बोलणं आटपून असं सर्वाना वाटलं पण जवळ जवळ 2 तास झाले तरी ते रूमच्या बाहेर येत नाही पाहिल्यावर सर्वांच्या तोंडचे पाणी पळालं, एव्हाना सर्वांना केतकीच्या राग आला होणारा नवरा असला तरी ती मुलगी होती. तिने लगेच बाहेर यायला हवं होतं, थोड्या वेळाने राज बाहेर आला, त्याने मामीला सांगितलं केतकीला बंर नाही तर तुम्ही आता त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी जावू नका, तुम्ही थोडावेळ आमच्या बरोबर थांबा आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे , मग केतकीच्या बाबांनी मलाही थांबू द्यात म्हटलं पण मग त्यांनी चर्चा कँन्सल केली. आणि केतकीला आराम करू द्यात तिला दोन दिवस काही विचारू नका दोन दिवसांनी सांगेल ती मग आपण एकत्र येवून चर्चा करू म्हंटल नी मामा मामी सकट सर्व घरी निघाले, केतकीचे डोळे सुजले होते, पण ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, घरीही मामी ,आई तिला खोदून खोदून विचारत होते, तरी काहीही सांगत नव्हती, ते घरी पोहचले, 4 तास झाले तरी त्यांनी केतकीच्या खुशाली विचारण्यासाठी फोन केला नव्हता,आत तर मामा संतप्त झाला होता, अचानक संध्याकाळी चार वाजता , दरात रिक्षा थांबली गावाहून काका, काकू लग्नासाठी आले होते. केतकी खोलीत झोपली होती. कोण आलंय पहाायला ही केतकीी बाहेर आलीी नाही ,त्याच्या चहापाण्याच आटपे पर्यत सहा वाजले, तेवढ्यात फोन खणखणला मामानेच उचलला विश्वराजच्या गााडीला अँक्सीडंट झालाा होता ,आई, बाबा ,मामा मामी काका जायला निघाले, काकू केतकी पाशी थांबली. .. .
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा