14 दरवळ

 


 कुणीच घरी फोन केला नाही बरीच रात्र झाली  तरी कुणी परत आलं नाही, केतकी ह्या सर्वात खूप थकली होती. काकू घरात जे पसारा म्हणून काम दिसत होते ते करत होती. केतकी कडून  हो नाही एवढीच उत्तरे मिळत होती.  पहाटे पहाटे काका व आई दोघे परत आले, काकूंनी सर्व सोपास्कार  पार पाडले. काकांना आईला खूप खोदून विचारले, ते काहीतरी कुजबुले पण केतकीला काही कळले नाही. दुसर्या दिवशी  संध्याकाळी  बाबा एकटे आले, खूप दुःखी  कष्टी झाले होते एकुलत्या  एक मुलीचे लग्न तेही इतक्या वाईट तरहेने तुटले. आईने विचारल्यावर बाबांनी बैठकीच्या खोलीत सर्वांना  बोलावले  विश्वराज  गाडी चालवत होता, त्याचे आई वडिल पाठच्या सीटवर बसले होते एवढा प्रवास व नंतर जागरण बहुतेक त्याला डोळ्यावर झापड आली किंवा गाडीवरच नियंत्रण सुटले व अँक्सीडंट  झाला, त्यात विश्वराज  जागेवरच गेला  आई वडिल दोघेही किरकोळ  जखमी झालेत पण ते धक्यातून  लगेच सावरणे शक्य नाही. केतकी  बद्दल  आपण काही बोलूच शकत नाही बोलण्या  सारखे काही राहीले नाही. तेव्हा  मामा, मामांनी आम्हाला नमस्कार  करून  आता या तुम्ही मी इथलं सर्व  पाहीन म्हटंल मी काय बोलणार पण ते काही आपल्याकडे परत येणार नाहीत, हे ऐकून केतकीला चक्कर  आली, काकूनीं,  आईने तिला सावरलं, त्याच्या मनावर कसला आघात झाला हे तिला समजलं बहुतेक त्यांनी आई बाबांना सांगितलं नसलं ,तरी घरी गेल्यावर कसं सांगायच  ह्याच विवंचनेत आसेल  आणि आपल्या मुर्खपणामुळे  हे घडलं हे तिला जाणवलं , लग्न तिथी टळून जाईपर्यंत  काका  काकूंनी रहायचे ठरविले, अनायासे ते लग्नासाठी आले होते, त्याच दरम्यान केतकीची रिझल्ट  लागून तिला इंटरव्ह्यसाठी शहरात जायचे होते, तिने तसे जतीनला कळवले, पण कामा अभावी तो भेटायला येवू शकला नाही, पण विश्वराज  बद्दल तिने सर्व त्याला फोनवर कळवलं, त्यावर त्याने दिलगिरी  व्यक्त  केली. बाकी तो काय करू शकणार होता . पण तो खूप सिरीयस  होवून  कामात लक्ष घालत होता. आँलमोस्ट  त्याचे काम पूर्ण  व्हायला आले होते. 

केतकी इंटरव्ह्यू  पास होवून जिल्हाधिकारी  (कलेक्टर) बनली. तिची दुसर्या जिल्हात नियुक्ती  झाली,सरकारी जागा मिळेपर्यंत  केतकी तिथे  पेईंग गेस्ट राहणार होती, पण तिला त्वरीत काँर्टर  मिळाली. तिथे आई व काकू सोबत म्हणून रहाणार होत्या. महिनाभराने काकू गावाला जाणार होत्या. भाग आदिवासी  व दुर्गम जिल्हाचा होता त्यामुळे केतकी एकटी राहू शकणार नव्हती,ती रूजू झाली, जाताना जतीनला भेटली, पण नाही, नंतर कान्टँक्ट  करते म्हणाली पण तेही राहून गेले, आता टेबलवर स्वताचा फोन  होता पण वैयक्तिक  काही बोलू शकणार नव्हती .आणि अचानक  तिला एक दिवस चक्कर  आली. वारंवार चक्कर येते  म्हंटल्यावर  आईच  मागे लागून केतकीला  डॉ .कडे चल म्हणाली... .


 क्रमशः 

वर्षा पाटील ©️®️🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4