10 दरवळ 6/09/2021



 रात्री जतीनला आईने सांगितले  की केतकीची फोन आला होता,  बहुतेक लग्न  वैगरे ठरलं असं काहीतरी म्हणत होती पण  मी काही नीट विचारलं नाही आपल्याला काय आमंत्रण येईलच मग काय बस्स  बरं मीही सांगून टाकलं आम्ही अजून दोन वर्ष   जतीनचं  लग्न2 वर्ष   करणार नाही आहोत  म्हणून अग असं तिला कशाला सांगितलंस ती काय तूझ्या मुलाच्या मागे लागलीय का? असे म्हणत जतीन फोन करायला निघून गेला

बर्याच रात्री जतीनने फोन केला.केतकीला हायसं,वाटलं, तिने दिलेला निरोप जतीनला मिळाला होता. बर्याच रात्रीपर्यंत दोघ बोलत होते. त्यांच बोलणं संपल्यावर केतकी खोलीत झोपायला गेली. 

  सकाळी उठल्यावर केतकी खूपच फ्रेश वाटत होती. आई ला केतकीला फ्रेश पाहून प्रसन्न वाटलं. दुपारी केतकी अभ्यास करत असताना दारात पोस्टमन येवून लिफाफा देवून गेला. आईने केतकीला म्हंटल,महिनाभरात  सर्व तयारी करायची आहे  तेव्हा मामा मामी एक दोन दिवसात येतील, तसं तर आताच त्याच्यांघरी लग्न होवून गेलं त्यामुळे सर्वच व्यवस्थित  होईल, आपल्याला ह्या येत्या रविवारी सर्व खरेदीला जायचं आहे,, त्यावर अभ्यासातून डोक वर काढत केतकी म्हणाली आग ह्या रविवारी मला स्पर्धा परिषेला जायचं आहे, तेव्हा नंतर बघू, त्यावर आई म्हणाली,  बंर झालं आता तू  अभ्यासातून मोकळी होशील, मग सर्व खरेदी पटापट करून होईल, बाबांसुद्धा आजच बँकेत जावून आलेत एकूण खर्चाचा आढावा आम्ही दोघांनी घेतला आणि  साधारण तेवढी रक्कम काढून आणली, नंतरच्या खर्चाला,लग्नाला आठ दिवस  असताना बघू !  आयत्या वेळेला जास्तीचे पैसे घरात असलेले बरे, केतकी अभ्यासात मग्न होती आणि आई एकटीच बडबडत होती, जसे आईच्या लक्षात आले तसे ती चहा करण्यास निघून गेली.

रविवारी सकाळी पहाटे  केतकी परीक्षेसाठी निघाली, परिक्षा तालुक्याच्या  गावी होती,  म्हणून वडिलही मी सोबत येतो म्हणाले, पण केतकीने मी एकटी जाईन म्हटले,  पेपर दहा वाजता होता, नऊ वाजता केतकी  परिक्षा सेंटर ला पोहचली,   वर्ग नंबर सर्व पाहून परत ती फाटका समोरील पायरीवर बसली थोडी अस्वस्थ ,खूप गर्दी  होती, तिच लक्ष सतत फाटकापाशी जात होतं,  पेपर सुरू व्हायला 10 -15 मिनिटं असताना जतीन फाटकातून आत आला, आणि तिला हायसं वाटलं, ती थोडीफार बडबड करून पेपर लिहायला आत निघून गेली, . 

तीन तासांनी केतकी पेपर देवून बाहेर आली. पेपर छानच गेला होता. समोरचं जतीन होता.त्याने गाडीला किक मारली, जवळच समुद्र किनारा होता, व ऐन, माड अशी मोठ, मोठी झाडं असलेलं बन होतं,  समुद्र किनारी जोरदार वारा होता, झाडांच्या सावलीत बसून,  थोडावेळ लाटांची गाज ऐकत राहीले, वाराही कानात गोंगावत होता, पोटात भूकही लागली होती समुद्र किनारी एक अलिशान हॉटेल होतं,  जतीनचे आपला मोर्चा तिथे वळवला, तो तीन तास भटकून तेच शोधत होता, काऊंटरवर जावून त्याने , बाहेर बुक केलेल्या टेबलवर मेनूकार्ड पाठवायला सांगितलं केतकीला टेबलवर बसवून, केतकीला तू मेनूकार्ड  बघ,  मी फ्रेश होवून येतो, म्हणाला,   

क्रमशः 

वर्षा पाटील. ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4