7) दरवळ
दारात गाडी थांबली, मामा, मामी, त्यांचे मित्र, व मित्राची बायको उतरले, त्यांच स्वागत करायला केतकीची आई बाबा धावले. ,केतकीला भांबावून काय करावं समजेना ती किचन मध्ये गेली. पाहुण्यांना हातपाय धुण्यासाठी पाण्याची बादली व हात पुसण्यासाठी नँपकीन घेवून आली. आईला तिची तत्परता पाहून बंऱ वाटलं, पाहुणे येणार हे कळल्यामुळे आधीच घर छान आवरून ठेवलं होतं, घरात पाहुणे स्थानापन्न झाल्यावर केतकीने त्यांना पिण्यास पाणी आणले. व चहा पँटीसची तयारी करण्यास आत गेली, इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन झाल्यावर मामीने म्हटलं अग आताच भेटलो होतो तरी लगेच परत आलो कारण विश्वराज ह्यांचा मुलगा पुढच्याच महिन्यात भारतात येणार आहे, एक आपला सर्वांचा सहकुटुंब व एक केतकीचा असे दोन फोटो पाठवून त्याला आपल्या सर्व कुटुंबाची माहीती दिली. पुढच्याच महिन्यात तो येणार आहे एक महिना राहून लग्न करून जाणार आहे. दोन्ही कुटुंबातील हे पहिलंच लग्न आहे, त्यामुळे सर्व तयारीला एक महिना अवधी पुरेसा नाही. तुमचं काय मत आहे, ह्या साठी आम्ही घाईघाईत येवून तुमचं मत विचारलं आहे. ह्यावर केतकीच्या आईने हसून म्हंटल अहो तुम्ही आलात ते योग्यच आहे . जे तूम्ही ठरवलं ते आम्हाला मान्य आहे. केतकी ने तेवढ्यात चहा, पँटीस,चिवडा,आणी लाडु एका ट्रे मध्ये घेवून आली .मामीने एक इनव्हलप पर्समधून बाहेर काढलं आणि केतकीच्या हातात देत म्हंटल अग हे घे आणि नंतर सावकाशीनं बघ. तेव्हढ्यात व्यंकटेश मामाने आणलेला खाऊचा डबा केतकीच्या हातात दिला, व सांगितले स्वीट आहे हे घे. तो खाऊचा डबा आईने केतकीच्या हातातून घेवून किचन मध्ये गेली. व्यंकटेश च्या आईनी तिच्या आईला हळदीकुंकू आणायला सांगितले, येताना आईने डिश मध्ये मामाने आणलेलं स्वीट आणलं व विश्वराजच्या आईने केतकीला बसायची खूण केली.केतकीला व सर्वांना हळदीकुंकू लावले आणलेले गजरे तिघींना दिले, आणि भला मोठा बाँक्स केतकीच्या हातात दिला. केतकी थोडी गडबडून गेली मामाने तिला घ्यायची खूण केली. केतकी ने गिफ्ट घेतल्यावर केतकीच्या आईने सर्वांच्या हातात स्वीट दिले. गिफ्ट ठेवायच्या निमित्ताने केतकी तिथून निघून गेली. ..
क्रमशः7
वर्षा पाटील©®🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा