12 दरवळ
आई बाबांचा विश्वास, खूपं महत्वाचा असतो, केतकी प्रवासात खूप थकलीय सांगून ती वाँशरूम मध्ये वाँश घेवून झोपी गेली. दुपार झाली तरी केतकी उठत नाही पाहून आईने दरवाजा ठोठावला, बड्या मुश्किलीने केतकीने दार उघडले, रात्रीही जेवली नाहीस, आताही उठत नाहीस, जेवायचं नाही का? अजून थोडा वेळ झोपू देत, करून केतकीने धाडकन दरवाजा आपटला, नी परत झोपी गेली. संध्याकाळी प्रचंड भुक लागली नी केतकी वाँश घेवून बाहेर हाँलमध्ये आली, आईने चहा आणून दिला, लाडू चिवडा दिला नी सर्व विसरून होईल ते होईल त्याला सामोर जायचं करून केतकीने खायला डिश उचलली. तिचा हात एकदाही फोन लावायला धजवला नाही.
आई म्हणाली आता परीक्षेचं ओझ उतरलं आता तरी नीट केव्हा कधी कसं खरेदीला जायचं ते ठरवूयातं.
अग मला आधी नीट खाऊ तर देशील की नाही केतकी उतरली कधीही उलटून न बोलणारी केतकी असं काय बोलतेय आईने अगं पेपर आणि परिषा तू राहणार आहेस का? भारतात, त्यावर केतकीला सर्व आईला सांगावसं वाटलं, पण तीची बोलण्याची इच्छा नव्हती.
तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. मामा, मामी आले आई
बाबा सामान घरात आणायला धावले, नंणद भावजयच्या गप्पा ना ओघ आला. आईनी चहाचे आधण ठेवले, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली.
रात्री उशीरा केतकीने जतीनला फोन लावला, तेवढ्यात मामा हाँलमध्ये आला अरे वाह! एवढंया रात्री फोन म्हणजे इंटरनॅशनल फोन काँलच असणार फोनवर गप्पा पण सुरू झाल्या का? पलीकडून हँलो हँलोचा आवाज आला आणि केतकीने फोन कट केला. आता ती घरातून फोनही करू शकणार नव्हती. घरात रात्र रात्र जागरण सुरू झाली. आणि सामानाची लिस्ट, आमंत्रणाची लिस्ट, कपड्यांची लिस्ट आणि गप्पा ह्याला ऊत आला. केतकी अस्वस्थ आणि बेचैन दिसू लागली अशाच गप्पा घडत असताना विश्वराजच्या आईचा फोन आला.तुमचा जावई उद्या रात्री 10 वाजता येतोय त्याला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला सर्वांनी यायचं आहे. घरात आनंदाला उधाण आलं होतं पण त्यात केतकी सामील होवू शकत नव्हती, दुसर्या दिवशी किती वाजता निघायचं ह्यावर चर्चा सुरू झाल्या नी केतकी झोपायला आत निघून गेली.
क्रमशः ©️®️🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा