9)दरवळ3/sept/2021/316


 सकाळी उठून केतकीने जतीनला फोन लावला, फोन उचलला नाही, परत परत थोड्या थोड्या वेळाने तिने प्रयत्न केला,पण बहुतेक जतीनचे वडिलच फोन उचलत होते, ती वडिलांना नीटसं  ओळखत नव्हती, म्हणजे त्यांच्याशी सहज गप्पा मारणं शक्य नव्हतं, फोनला चिटकून बसणारा जतिन आता कुठेच फोन उचलत नव्हता, केतकी बेचैन झाली. असाच फोन लावला असता जतिनच्या आईने फोन उचलला, इकडच्या तिकडच्या  गप्पा झाल्या, मग  आईने तिला विचारलं अग काय करतेस सध्या? स्पर्धा  परीक्षेचा अभ्यास केतकी उतरली. मग लग्नाचा विचार लांबणीवर की काय? त्यावर केतकीला एक युक्ती सुचली जतीनची आई आपला मेसेज देते का पाहू? तिने सांगितलं  आई ,मामा,शोधतायत, तसं , एका ठिकाणी  बोलणं पण झालं, पण.....
तसं पण जतीन काय करतो काकी? केतकीने  विचारले, तो   construction site वर जातो, सकाळी  लवकर जातो आणि रात्री उशिरा  घरी येतो ,त्याला सध्या कामातून फुरसत नाही. दोन वर्ष तरी तो लग्नाच्या  विचारात नाही. जतीनच्या आईने पण आपला निर्णय  सांगितला बघू केतकीला कळतं का? ते..

क्रमशः भाग 9
वर्षा पाटील.©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4