खंड १ ला टाईम मशीन भाग:३
आपले पूर्वज अभ्यासू होते. त्यांनी विना शस्त्र/शास्त्र पृथ्वी🌎आणि ग्रह गोलांचाा, नक्षत्रांचा, दिशांचा, सूर्य☀️ आणि पृथ्वी तील अंतराचा, पृथ्वीवर होणाऱ्या भरती ओहोटीचा संबंध सलग 🌙चंद्माशी आहे त्याचा, ऋंतुंचा, ग्रहांचा शोध ह्याचा अभ्यास केला. सायन्सने नंतर ते तसच आहे. हे प्रायोगिक रित्या सिद्ध केलं.
प्रत्येक माणूस हा अनुकरण प्रिय असतो. प्रत्येक राजा हा प्रजेचा रक्षणकर्ता तर असलाच पाहीजे पण तो असा सर्व गुण संपन्न असला पाहिजे की प्रजेने त्यांचे अनुकरण करताना प्रजा अनिष्ट गोष्टींना बळी पडू नये. प्रजेत अराजकता माजू नये. म्हणूनच म्हणतात. यथा राजा तथा प्रजा.
पांचाली च्या सुड बुद्धी ने महाभारतील युद्ध झालं नाही. ते एक कारण आहे . पांचाली नंतर स्वताच्या परिवारात समरसून गेली होती. मग काय कारण होते?
राजा युधीष्ठीर प्रमाणे प्रजेतील प्रत्येक माणूस आपली संपत्ती व संपत्ती संपली की आपली पत्नी डावाला लावीत होते. आणि युधिष्ठिरची राजा असताना झालेली चूक गल्लोगल्ली करताना दिसत होते. त्यांना कितीही समजावले तरी ऐकत नव्हते, जुमानत नव्हते. युधीष्ठरला आपली चूक सुधारायला /प्रायश्चित्त करायला काहीही मार्ग नव्हता आणि म्हणूनच युद्ध करून युधिष्ठिर चे वर्चस्व अबाधित ठेवणे. योग्य होते. जनतेने राजाची चूक पोटात घालून तिचे अनुकरण केले नसते, तर कदाचित युद्ध झाले नसते. प्रत्येक स्त्री तेव्हा पांचाली बनत होती. आणि जनमासात अराजकता माजत होती. ते थांबवून , त्याच काळात घडणारी चूक कशी थांबवायची? राजाचा अपमान कसा रोखायचा? त्यावर उपाय म्हणून युद्ध पुकारले गेलं. थोड्या वेगळ्या मार्गाने घडणार्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न हेही एक टाईम मशीन चेच उदाहरण होते . पण एक छोटी गोष्ट टाळण्यासाठी प्रचंड मोठी हानी. हे बरोबर होत का ? तर हो कारण, ती गोष्ट तेव्हा टाळली गेली नाही. तर शतकानुशतके घराघरात, पिढ्यान पिढ्या तसंच घडणार होते आणि भारतीय संस्कृती ही कुठल्याही एका राजाची /पिढीची सुद्धा संपत्ती नाही. त्यामुळे भारतीय संस्कृती च्या जपणूकीसाठी राजाकडून घडलेली चूक तेव्हाच्या तेव्हा सुधारण्यासाठी युद्ध गरजेच होतं किंबहुना त्यांनी त्या चूकीसाठी पूर्ण राजघराणे संपवून टाकले, व त्याचा मूळ, कूळवंशज राजा 👑🔱🏰 ' 'परिक्षित ' कडून नविन पिढीचा उध्दार करण्याचा संकल्प केला गेला. खर तर राजपुत्र अभिमन्यूचा मृत्यू झाला नसता तर त्याच पिढीकडून पूढील पिढीचा उद्धार केला गेला असता, पण काळाला ते मान्य नव्हते. किंवा कौरवाने तसे घडू दिले नाही.
क्रमश:३
वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा