खंड १ला टाईम मशीन भाग १



टाईम मशीन ही संकल्पना खूपच छान आहे. त्यावर अनेक सिरीयल ,पिश्चर निघालेले आहेत. मुळात ती संकल्पना अस्तित्वात होती का? आणि असेल तर त्याची निर्मिती कुणी केली. आणि त्याचा वापर कधी करण्यात आला. 

आपले पूर्वज खूप हुशार होते. ते अनेक ऐतिहासिक कथेत आपल्याला पहायला मिळतं. देव स्वर्गात चालत जात. नारदमुनी तर नेहमी पृथ्वी लोकांचे निरोप देव लोकात घेवून जात, व देव लोकातील निरोप पृथ्वी लोकात घेवून येत त्या निरोपा नुसार पृथ्वी वर अनेक घटना /गोष्टी बदलल्या जात. 

सर्वात सुंदर उदाहरण द्यायचे झाले तर सावित्रीचे  देता येईल, तिचा पती मेल्यानंतर ती यमाच्या पाठोपाठ जावून तिने पतीचे प्राण परत मिळवले.  हे उदाहरण टाईम मशीनचे आहे हे आपल्याला माहीत होत का? आपण ते व्रतवैकल्ये करून मोठ्या थाटामाटात  साजरा करतो. घडलेली घटना बदलण्याचे धाडस तिच्यात होते. तीने व्रत केले. त्याही पेक्षा तिला यम राजाला विनवता आले  परत पतीचे प्राण मिळवता आले. एकतर तिचे आपल्या पतीवर प्रेम होते. तिच्या कडे पुण्य होते. आणि यमाशी संवाद साधण्याचे कौशल्य होते. म्हणजेच प्राण परत करताना यमाला तिच्यातील गुण हेरून तिच्या पतीचे प्राण परत देता आले. 

क्रमश:

वर्षा प्र पाटील. 

लोणी काळभोर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4