खंड १ला टाईम मशीन भाग :२
सावित्री ही एक सर्वसाधारण स्त्री होती. पण महाभारतातील उदाहरण घेतलं तर पंडू आणि कुंती ह्यांच्या मिलना नंतर राजा पंडूचा मृत्यू झाला. पण राणी कुंतीला आपल्या राजाचे प्राण परत आणता आले नाहीत, कुंती ही राज घराण्यातील स्त्री होती. अफाट ऐश्वर्य, सौन्दर्य,तिच्याजवळ होते. तेव्हा टाईम मशीन अस्तीत्वात नव्हती. की तिच्याकडे पुण्य नव्हते तेवढे, ? पती चे प्रेम परत आणण्याइतपत.! पण जर महाभारत काळात ऋषीमुनी कडे इतकी शक्ती होती, जर तेव्हा टाईम मशीन असती तर महाभारत घडले नसते. कृष्ण वध झाला नसता. काळाच्या ओघात जावून आपण आधी काय ? नंतर काय ? हे सांगू शकत असलो तरी तत्कालीन तसेच अस्तित्वात असेलच असे नाही. ते आपण सिद्ध ही करू शकत नाही. कारण एखाद्या ऋषीने आपली विद्या लपवलेली ही असू शकते.
टाईम मशीन म्हणजे भूतकाळात घडलेली घटना, जर चुकीची असेल, किंवा ती घडू नये , किंवा टाळता येईल असे वाटत असेल तर त्या काळात जावून ती घटना बदलायची /घडली नाही, असे दर्शवायचे. अशा अनेक घटना की ज्या घडल्या नसत्या तर इतिहास खूपच वेगळा असता. त्या टाळता आल्या नाहीत तरी निदान घडू नये असे पयत्न हवेत
क्रमश:२
वर्षा प्र पाटील.
लोणी काळभोर
वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा