रणांगण

 मी तूझा कधी तिरस्कार केला नाही. तूला कमीही लेखलं नाही. /कधी तुला नेस्तनाबूत कसं करायचं हा ही विचार केला नाही, पण प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं करून तू प्रथम युद्ध नीती अंवलबलीस, नंतर शत्रु समजून मला नेस्तानाबूत करायचा प्रयत्न केलास किल्ला सर केल्यासारखं माझ्या शहरावर कब्जा केलास, शत्रुने आपल्या परिसरावर कब्जा केल्यावर त्याचे कर आणि नियम लागू होतात, त्याप्रमाणे तू मला  तूझ्यापूढे हाजी हाजी करणार्याचीं बिल भरायला लावलीस, तुझे तुणतुणे गाणारे भाट, एखाद्या मोहीमेवर जाणार्या  हेरासारखे माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायच्या कामगिरीवर ठेवलेस, प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते, ह्या वाक्यात प्रेम हा शब्द विसरलास, ज्या प्रेमाचे तू रणांगण केलेस, तिथे फक्त दोन हद्यांची कत्तल झाली होती, आणि तुझे भाट सनई चौघडा घेवून अजिंक्य वीराची मिरवणूक काढण्यास सज्ज होत होते. 


वर्षा प्र पाटील©®

लोणी काळभोर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4