सरडा
रोज रंग बदलणारा सरडा ज्या दिवशी ,
त्याचा माझा रंग सारखाच असतो,
त्या दिवशी माझ्याशी मैत्री करतो,
इतर वेळी डोळे वटारून मला भिती घालतो.
रंगबेरंगी फुलपाखरू आज तू माझ्या ह्या रंगात,
मिसळतोस, करून रोज हजारो रंगाची माझ्या
रंगा बरोबर रसमिसळ करतो.
मीही मग हळूच त्याला मकरंद प्राशन करण्यास देते.
पराग वाहण्यास देते,
आणि गंध मिश्रित पाकळ्या,
झोपाळा म्हणून झुलण्यास देते,
रंगबेरंगी फूलं आणि फुलपाखरू,
ह्यांची मैत्री आणि रंग बदलणारा सरडा ,
दोन्ही प्रकृतीचीच उदाहरणे आहेत.
मानवाचे मानसरंगही असेच असतात,
त्यात फसवी मैत्री, आणि निष्पाप,
मदत करणारी अल्लड मैत्री ओळखता आली,
म्हणजे जगणे सहजसोपं होते,
नाहीतर नात्यात, मैत्रीत गुतंलेल्या धाग्यांचा गुंता
सोडवण्यातच निष्फळ वेळ फूकट जायचा,
वर्षा प्र पाटील.
उरण, नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा