शेजार भाग १
तिने चहापाउडरचा डबा शोधून काढला, साखर दूध पातेल्यात घेवून किचनपाशी गेली इलेक्ट्रीक केटल मध्ये दूध ओतून चहा तयार केला, एवढे सामान शेवटच्या मजल्यावर चढवताना ती दमली होती, स्वत:च आवरून प्रत्येक जण आज कामाला गेला होता, अर्पणा एकटीच घर आवरत होती दुपारच्या गर्मीत खरं तर थंडगार सरबत. चाललं असतं पण अजून रेफ्रिजरेटर मध्ये बर्फ तयार झाला नव्हता, हातात गरम चहाचा 'मग' घेवून ती बाल्कनीतून खाली न्याहाळत उभी राहीली. आणि अचानक तिला जाणवलं आपण आपल्या शेजारी कोण आहे ते पाहिलंच नाही. निदान दोन दिवसात तिला त्या घरातून काहीही आवाज आला नव्हता पण लाईट चालू होता, म्हणजे बंद नक्कीच नव्हतं आणि आवाज ,गोंगाट नाही म्हणजे फँमिली नाही. आता कुंडीतील झाडांना पाणी घालून संध्याकाळ पर्यत किचन लावायचा होतं नाहीतर रात्रीच्या जेवणाच्या वस्तू शोधत दमछाक व्हायची, तिने शेजारच्यांचा विषय मनातून काढून किचन लावण्यात मग्न झाली. ...
क्रमशः
वर्षा प्र पाटील.
उरण, नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा