शेजार भाग :२


संध्याकाळी मुल शाळा, काॅलेजातून आली, आणि त्यांच्या  चहापाण्याच आवरून  अपर्णा रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली, नवरा यायला अवकाश होता, मुलांची जेवणं आटपून ती नवर्याची वाट पहात बसली, मुलं टिव्हीवर कसलासा कार्यक्रम पहात होती, तीने हातात राहिलेलं ़विण काम करायला घेतलं, नविन जागा प्रशस्त होती, जून्या जागे पेक्षा कमी किंमतीत मिळाली होती, रहदारीची शहरातील जागा सोडून ती कुटूंबासह उपनगरात शिफ्ट  झाली त्यांच कारण मुलांना शाळा, काँलेज जवळ, त्याहून जागा स्वस्त मोठी निंवात, नवर्याला जरा त्रास होता, त्याला जास्त वेळेचा प्रवास होता, पण प्रवास उलटा, म्हणजे गर्दी नाही, आणि आँफीस ते घर फक्त बसचा प्रवास आणि तोही बसून त्याने स्वताच निर्णय घेतला व जागा बदलली, नविनच त्याला प्रमोशन मिळालं होतं त्या मुळे लवकर येणं नाही. दारावरची बेल वाजली आणि ती हातातलं विणकम सोडून उठली...... 

सकाळी सर्व जण आपापल्या कामावर निघून गेले, आणि अर्पणा तिच्या कामाला लागली, दिवसभर घरात एकटी मुलांच  करण्यासाठी  तिने नोकरी सोडली. मुलांच्या करण्यात तिचा सारा वेळ जायचा, नंतर नंतर वेळ मिळाल्यावर ती विणकाम, झाडांची निगा ह्या आवडत्या छंदात आपला वेळ घालवू लागली,पून्हा नोकरी करावी, असं तिच्या मनात खूपदा आलं, पण मुलांच्या संगोपनाकडे तिने झुकतं माप दिलं. आता मुलं तशी समजुतदार, व मोठी झाली, पण नोकरीची वेळ निघून गेली, त्यामुळे पुर्ण वेळ संपूर्ण घर आपल्या मर्जीनुसार सांभाळायच निर्णय तिने घेतला.... 

क्रमश;२

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4