चाहूल

 काजळलेली संध्याकाळ, 

मनात माझ्या , हुरहूर

क्या लागते अशावेळी

 तूझ्या येण्याची चाहुल, 

दिवे लागण, आणि 

रामरक्षेची वेळ, 

पण, क्षणिक 

तुझ्या आठवणींने, 

हद्यात उठते, 

आठवणींचे काहूर, 

शुभवेळेचे क्षणात, 

होते रणकंदन, 

दाटलेले, ढग नी ... 

झाकोळलेले अभाळ, 

अस्ताला गेलेला सुर्य,

 नी झोंबणारा वारा, 

अभेद्य अशा लाटा, 

नी सावरणारा किनारा, 

का वाटते? अशा वेळी ,

तूझ्या येण्याची चाहूल...



वर्षा प्र पाटील. ©®

उरण, नवी मुंबई.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4