सत्य

 तूझ्या पाउलावर पाउल ठेवून 

जगणं, कधी मला जमलच नाही, 

तूझ्या सांगण्यावर,

 विश्वास ठेवणं ही कधी जमल नाही, 

 तूझ्ं समजांवण कधी रूचलचं नाही, 

प्रत्येक नात्यातील क्रृत्रीमता..... 

खोटी मन जोडणं कधी मला आलंच नाही, 

हद्यात ओलावा, तयार करणं कधी जमलेच नाही

डोळ्यातून पाणी कधी ओघळलचं नाही, 

दगडाला पाझर कधी फूटलाच नाही. 

खोटं हसणं, कधी उमटलचं नाही, 

आणि खोट जगणं मला जगता आलच नाही. 

सत्याला न्याय कधी मिळालाच नाही. 


वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4