नजर


 औंदूबराखाली,

 निळ्याशार डोहा काठी 

 मी शब्द शृंगार केला, 

 तूला तो कळलाच नाही.

 कारण तू वासनाधीन झाला होतास,

 तूला त्या शब्द सुमनांच्या अर्थच कळला नाही

तूला दिसत होते, फक्त माझे आरक्त गाल

खांद्यावरून सरकलेली ओढणी, 

भूरभूरणारे केस, एका बेसावध क्षणी, 

तू म्हणालास, जा मी तूला, मोकळे केले, 

आता तूला समजेल, एक बोचरी नजर, तू झिडकारलीस, आता असंख्य विखारी नजरा 

तूला बोचकारतील, स्पर्शही न करता.. 

त्याचा अर्थ ही न लावता, तूझा श्वास कोंडेल,

अंगभर कपडे असताना, त्यातील विवस्त्रता जाणवेल,

मीही शोधत राहीले,जुळणारी शब्द सुमने

मीही धम्म भगवान बुद्ध शोधत राहीले, प्रत्येकाच्या नजरेत.......


वर्षा प्र. पाटील. ©®

उरण नवी मुंबई.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4